धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.

योजनेचे नाव : धर्मादाय रुग्णालयात / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
योजने बद्दलचा शासन निर्णय : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ क क अंतर्गत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (पीआयएल) क्र.३१३२/२००४ मध्ये क्र. १७ ऑगस्ट, २००६ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार मंजूर केलेली योजना. सदर रिट याचिकेवर दि.१५ एप्रिल, २००९ रोजी अंतिम आदेश निर्गमित झालेले आहेत.
योजनेचा प्रकार : वैद्यकीय.
योजनेचा उद्देश : गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने धर्मादाय रुग्णालयात वैद्यकीय उपचार उपलब्ध होणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : गरीब रुग्ण व दुर्बल घटकातील रुग्ण.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • गरीब रुग्ण- ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ५०,०००/- पर्यन्त आहे.
  • दुर्बल घटकातील रुग्ण – ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु.१,००,०००/- पर्यन्त आहे.
आवश्यक कागदपत्रे : शिधापत्रिका / तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र / दारिद्र्यरेषेखालील पत्रिका.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : गरीब रुग्णांना मोफत व दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दराने संबंधित धर्मादाय रुग्णालयात उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार प्राप्त होणे.
अर्ज करण्याची पद्धत : संबंधित धर्मादाय रुग्णालयात आवश्यक त्या कागदपत्रासहित परस्पर अर्ज दाखल करणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ——-
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधीत जिल्हाचे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: टीप:- धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या e-governance या कार्यक्रमांतर्गत हॉस्पिटल module go-live झालेले असून charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर धर्मादाय रुग्णालयासंबंधित माहिती उपलब्ध होत आहे.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply