नळदुर्ग

बांधणाऱ्याचे नाव :महमूद गवान

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.

उस्मानाबाद पासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील ‘पाणी महाल’ प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी.घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग रक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो.

स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.

परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.

हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गावानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत रहिला.

हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे.परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

9 comments

  1. Pingback: ratucapsa

  2. Pingback: paris qq

  3. Pingback: elements of digital marketing

  4. Pingback: Odontologijos klinika Kaune

  5. Pingback: senangpoker

  6. Pingback: www.rajacapsaq.site

  7. Pingback: Jolene

  8. Pingback: cbd oil

  9. Pingback: porn

Leave a Reply