पंढरपूर

पंढरपूर

पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव ‘पंडरगे’ असे आहे.

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठीसंपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे.

विठ्ठल मंदिराचा इतिहास

पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती. हे मंदिर वाहून गेले आहे. पण त्याचा प्रचंड मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो.डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी नव्याने उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे स्नुमान करता येते की,शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. ‘स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा ‘लानमडू’ हळूहळू वाढत गेला. शके ११५९ मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिला.शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र देवराव यादव व त्याचा करणाधिप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेवून या देवळाची वाढ केली.आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली.देवळाचा विस्तार शके १९२५ च्या सुमारास पुष्कळच झाला.

पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितांत पंडरिगे-पंडरगे-पौंड्रीकपूर- पुंडरिकपूर- पंढरपूर – पंढरी अशा विविध नावांनी ओळखले जाते. विठ्ठलाला द्वैती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले. पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला, अशी ही कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्तही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. आणि कर्नाटकाचे पक्वान्न ‘पुरणपोळी’च विठ्ठलाच्या नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते.

चंद्रभागा

भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणार्‍यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सति, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बर्‍यच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात, तोच खरा असावा.

तीर्थक्षेत्र

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात – चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणार्‍या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.

पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या २३७४४६ (२०११)[१] इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे.

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात – चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणार्‍या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात.

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.

देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवतास सूर्याचा अंशही मानतात.

गोपाळपूर

पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे मंदिर आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादश्यंना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्रीर) आलेले भाविक एकादशीच्या दुसर्‍या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.

विष्णुपद

या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात .येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते .या मासात येथे भाविकांची खूप गर्दी असते.

वर्णन

चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी’ म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.

मंदिराचे स्वरूप

मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवर्‍यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायर्‍या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास सन्त एकनाथ महाराजाचे पणजोबा सन्त भानुदास महाराजान्ची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.

चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.

देवळास समांतर पूर्वेकडे जाणार्‍या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकर्‍यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.

सजावट

विठोबावे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबात व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे, बेणारे इत्यादींच्या ह्क्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत; आणि त्यांबाबत निरनिराळ्या वेळी निर्णयही झाले आहेत. शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय व्यवस्थेबाबत काही निर्णय केले होते, तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.

परिसर

नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.

पंढरपूरमधील मठांचा आणि फडांचा
इतिहास

वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा, काíतकी एकादशी, चत्री आणि माघी एकादशीनिमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे. तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते. पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हर्षे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. डॉ. हर्षे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील वा.ल. मंजूळ यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंड्यांचा इतिहास शब्दबद्ध केला.

ग्रंथात काय आहे ?

पंढरपूरमधील ४० प्रमुख मठांचा इतिहास

साडेतीनशे दिंड्यांचा इतिहास

६० फडांची माहिती

मठ, फड, दिंडी यांच्या व्याख्या आणि महत्त्वाच्या नोंदी

मूळ अभ्यासक डॉ. हर्षे यांचे मनोगत

संशोधनाची मीमांसा

पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास

पुणेकर संशोधक वैशाली लाटकर यांनी ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा संशोधन प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करत आणला आहे. (मार्च २०१७ची बातमी).

वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट असून त्या या प्रकल्पावर पाच वर्षे काम करीत होत्या. त्या पाच वर्षांत त्यांनी पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड आणि घाट यांचा स्थापत्त्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला. पंढरपुरात यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार असणाऱ्या म्हणजे तत्कालीन वास्तूंच्या स्वरूपात आढळतो. वास्तुसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना वैशाली लाटकर यांनी पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा प्रामुख्याने विचार केला. त्यांमध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मते, फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. ह्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केलेले आहे. हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत, मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत, असे त्या म्हणतात. त्या वास्तूंचा स्थापत्त्याच्या अंगाने अभ्यास आता झाला आहे.

कुरवपूर (जि.रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.

मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते.

दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा-यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.

कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा-यांना भोजनासाठी आधी सांगावे लागते.

—————————————————————————————-

श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.

कुरवपुर येथील गुहा:

या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली. महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसु शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे.

फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पवित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच.

सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुकमे १७०५‘ उत्तर, ते १८०११´ उत्तर अक्षांश व ७३०३३´ पूर्व ते ७४० ५४´ पूर्व रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्‍नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल अंतर १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोर्‍यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोर्‍यात मोडतो. सातारा (लोकसंख्या १,५७,०००–२००१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ४) वसले आहे.

चतुःसीमा

सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या

पूर्वेस – सोलापूर जिल्हा,

पश्चिमेस – रत्‍नागिरी जिल्हा,

वायव्येस – रायगड जिल्हा

उत्तरेस – पुणे जिल्हा व

दक्षिणेस – सांगली जिल्हा ..

भूवर्णन

पर्वत व डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील उंच पठारी प्रदेश व टेकड्या, उंच सखल भूमी, सपाट मैदानी प्रदेश अशी सातारा जिल्ह्याची प्राकृतिक विविधता आढळते. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश, कृष्णा नदीखोर्‍याचा प्रदेश, नीरा नदीखोर्‍याचा प्रदेश आणि पूर्वेकडील टेकड्यांचा व माळरानाचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत सह्याद्रीचा विस्तार आहे. कृष्णा नदी खोर्‍याचा दुसरा स्वाभाविक विभाग सुमारे ३२ किमी. रुंदीचा व साधारण सपाट असून याच्या साधारण मध्यातून कृष्णा नदी वाहते. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोर्‍याच्या प्रदेशात येतात. येथील जमीन काळी, कसदार व पिकाऊ आहे. नीरा नदी खोर्‍याच्या प्रदेशात खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग अंतर्भूत होतो. कृष्णा नदी खोर्‍याच्या पूर्वेकडील चौथा स्वाभाविक प्रदेश कमी पावसाचा आणि बहुतांश माळरानाचा आहे. येथील जमीन हलकी, वैराण आणि कमी प्रतीची आहे. कमी पावसामुळे या भागात वारंवार अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. खटाव व माण तालुक्यांचा बहुतांश भाग या स्वाभाविक विभागात येतो.

डोंगररांगा

सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयेस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयेस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सुमारे ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेप्रमाणेच ही रांग उंच, जटिल आहे. या रांगेच्या अगदी दक्षिण भागात घेरादातेगड हे तटबंदीयुक्त शिखर आहे. बामणोली-घेरादातेगड रांगेपासून पूर्वेस व आग्नेयेस मैदानी भागातून सातारा, केळवली-सोनापूर व जळू-वसंतगड या तीन मुख्य सोंडी गेलेल्या आहेत. पैकी सातारा ही सोंड केळघर येथून सुरू होऊन सातारा शहरापासून तशीच पुढे उरमोडी-कृष्णा या नद्यांच्या संगमापर्यंत पसरली आहे. या सोंडेमुळे वेण्णा व उरमोडी या नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. या रांगेत सातारा शहराजवळ सातारा किंवा अजिंक्यतारा (१,००२ मी.) हा तटबंदीयुक्त किल्ला आहे. केळवली-सोनापूर ही दुसरी सोंड कमी लांबीची व काहीशी विखुरलेली व अनियमित स्वरूपाची आहे. या रांगेतील एका सोंडेवर सज्जनगड (सस.पासून ९०९ मी.) हा किल्ला आहे. जळू-वसंतगड ही तिसरी सोंड केळवलीच्या दक्षिणेस १४ किमी.वर बामणोली-घेरादातेगड रांगेपासून सुरू होऊन दक्षिणेस पाटणपर्यंत गेलेली आहे. पाटणच्या ईशान्येस ३ किमी.वर ही रांग आग्नेयेकडे कराडजवळील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमाच्या दिशेने गेली आहे. तिच्या काही भागाने तारळी व केरा नद्यांची खोरी तसेच कृष्णा व तिची उपनदी मांड आणि कोयना खोरे विभागली गेली आहेत. या रांगेच्या अगदी आग्नेय भागात कराडच्या वायव्येस ६ किमी.वर वसंतगड हा किल्ला आहे. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य व दक्षिण भागात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दी लगत भैरवगड-कांदूर ही डोंगररांग आहे. तिचा बराचसा भाग सांगली जिल्ह्यात असून, काही फाटे सातारा जिल्ह्यात ईशान्य व पूर्वदिशेत पसरले आहेत. त्यांपैकी कोयना व मोरणा या नद्यांदरम्यानचा गुणवंत गडफाटा, मोरणा-कोळे (वांग) नद्यांच्या दरम्यानचा काहीर-किरपा फाटा आणि कोळे नदी-नांदगाव ओढा यांदरम्यानचा काळेगाव-जखीणवाडी फाटा हे तीन फाटे महत्त्वाचे आहेत.

सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील महादेव डोंगररांगा आणि त्यांचे फाटे विशेष महत्त्वाचे आहेत. मुख्य महादेव रांगेच्या उत्तरेस नीरा नदीचे, तर दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. ही डोंगररांग महाबळेश्वरच्या उत्तरे सुमारे १६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन संपूर्ण जिल्ह्यात ती पूर्वेस किंवा आग्नेयेस पसरली आहे. या श्रेणीची सुमारे ४८ किमी. अंतरापर्यंत म्हणजे खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. त्यानंतर ती आग्नेयेकडे वळली असून सातारा जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीपर्यंत या डोंगररांगांचा विस्तार कमी-अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तडवळे गावापासून या रांगा अनियमित स्वरूपाच्या आहेत. महादेव डोंगररांगा काही ठिकाणी खंडित झालेल्या असून निरनिराळ्या भागांत त्या वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. पश्चिमेकडे त्यांना गांधार देव डोंगर, मध्यभागी म्हस्कोबाचे डोंगर तर पूर्वेकडे सीताबाईचे डोंगर म्हणून ओळखले जाते. महादेव श्रेणीच्या दक्षिणेकडे गेलेल्या फाट्यांवर जरी अनेक किल्ले असले, तरी तिच्या मुख्य रांगेवर केंजळगड किंवा घेरा-केळंजा अथवा केंजाळा (१,३०१ मी.), ताथवडा (संतोषगड) व वारुगड असे फक्त तीनच किल्ले आहेत. त्यांपैकी घेरा-केंजाळा किल्ला महाबळेश्वरच्या ईशान्येस २२ किमी.वर, ताथवडा किल्ला माण तालुक्यातील दहिवडीपासून वायव्येस ३२ किमी.वर, तर वारुगड दहिवडीच्या उत्तरेस १८ किमी.वर आहे. महादेव श्रेणीत अनेक घाट मार्ग गेलेले आहेत. त्यांपैकी खंबाटकी घाटमार्ग सातार्‍याच्या उत्तरेस ४५ किमी. वर असून त्यातून पुणे-सातारा-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ गेला आहे. खंबाटकीच्या आग्नेयेस १९ किमी.वरील तडवळेजवळ असलेल्या घाटातून वाई-आदर्की व पुणे-सातारा हे दोन रस्ते गेलेले आहेत.

मुख्य महादेव डोंगररांगेपासून चंदन-वंदन, वर्धनगड आणि महिमानगड असे तीन प्रमुख फाटे दक्षिणेस गेलेले आहेत. या डोंगर रांगेने कृष्णा व वसना या नद्यांची खोरी वेगळी झाली असून, चंदन-वंदन हे दोन डोंगरी किल्ले या रांगेच्या साधारण मध्यावर आहेत. वर्धनगड डोंगररांग खटाव तालुक्यातील मोळगावापासून सुरू होऊन दक्षिणेस ८० किमी. पर्यंत सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावरील कुंडलपर्यंत गेलेली आहे.

सातारा जिल्ह्यात, विशेषतः वाई, जावळी आणि पाटण तालुक्यांत, मुख्य सह्याद्रीचे आणि शंभू महादेवाच्या डोंगरांचे माथे पूर्वेकडून पश्चिमेकडे ते क्रमाक्रमाने एकामागून एक असे उंच होत गेलेल्या पठारी मालिकांच्या पृष्ठभागावरील किल्ल्यांप्रमाणे दिसतात; कारण ते पृष्ठीय थर खडकाळ तटांमुळे तयार झालेले आहेत. पूर्वेकडून दख्खनच्या पठारी प्रदेशाकडून सह्याद्रीची उंची फार वाटत नाही; परंतु कोकण भागाकडून सह्याद्रीचे कडे ठळकपणे दिसून येतात. काही ठिकाणी या कड्यांचा उतार प्रपाती असून तेथे त्यांची खोली ९०० मी. पेक्षा अधिक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची पूर्वेस कमी कमी होत गेलेली आहे. महादेव डोंगररांगेचाही उत्तरेकडील नीरा नदीकडील उतार तीव्र असून दक्षिणेकडील कृष्णा खोर्‍यातील उतार त्यामानाने कमी आहे. सह्याद्रीच्या बहुतांश रांगा विदारित स्वरूपाच्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्री रांगेत व तिच्या फाट्यांवर अनेक टेकड्या व डोंगरी किल्ले आहेत. विशेषतः वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम व वनव्याप्त प्रदेश लक्षात घेता त्या परिसरात अनेक डोंगरी किल्ले उभारले आहेत. वाई व खंडाळा तालुक्यांत बालेघर, धामणा, हरळी, कमळगड, केंजळगड, मांढरदेव, पाचगणी, पांडवगड, पिपली, सोनजाई, वागदरा, वंदन, वैराटगड, येरुळी (वेरुळी) या महत्त्वाच्या टेकड्या आहेत. यांपैकी सोनजाई ही सर्वांत कमी उंचीची (१,००२ मीटर), तर येरुळी ही सर्वाधिक उंचीची (१,३८१ मी.) टेकडी आहे. पाचगणी हे प्रसिद्घ थंड हवेचे ठिकाण आहे. वाईपासून पश्चिमेस १६ किमी. वरकमळगड (१,३७५ मी.), वायव्येस १८ किमी.वर केंजळगड (१,३०१ मी.),उत्तरेस ५ किमी. वरपांडवगड (१,२७३ मी.), आग्नेयेस १० किमी.वर वैराटगड (१,२०० मी.) . वरवंदन (१,१७४ मी.) हे डोंगरी किल्ले आहेत.

महाबळेश्वर व जावळी तालुक्यांत महाबळेश्वर, मकरंदगड, प्रतापगड आणि वासोटा ही उंच ठिकाणे असून त्यांपैकी महाबळेश्वर हे थंड हवेचे प्रसिद्घ गिरिस्थान, तर बाकीचे तीन डोंगरी किल्ले आहेत. महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस ११ किमी.वर मकरंदगड, दक्षिणेस २६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वासोटा (१,१७२ मी.), तर नैर्ऋत्येस १३ किमी.वर इतिहास प्रसिद्घ प्रतापगड (१,०८१ मी.) किल्ला आहे.

सातारा विभागातील प्रमुख टेकड्यांत अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड, पेटोवा, घाटाई, पाटेश्वर आणि शूळपाणी यांचा समावेश होतो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर आहे. सातार्‍यापासून नैर्ऋत्येस सुमारे १० किमी.वर सज्जनगड (परळी-सज्जनगड) किल्ला आहे. कोरेगाव तालुक्यात हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी आणि चंदन या पाचटेकड्या आहेत. त्यांपैकी नांदगिरी, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले असून ते सातार्‍यापासून अनुक्रमे ईशान्येस १९ किमी., उत्तरेस २४ किमी. व पूर्वेस १३ किमी. अंतरावर आहेत. पाटणच्या परिसरात चांदली, दातेगड, गुणवंतगड (मोरगिरी), भैरवगड व जंगली-जयगड या प्रमुख पाच टेकड्या असून त्यांपैकी चांदली वगळता उर्वरित चार टेकड्यांवर तटबंदी आहे.

कराड परिसरात आगाशिव, पाल, सदाशिवगड व वसंतगड या चार टेकड्या आहेत. कराडच्या नैर्ऋत्येस सुमारे १० किमी.वर असलेल्या आगाशिव टेकडीचा माथा टोकदार असून तेथील खडकांत काही बौद्घ लेणी आहेत. पाल खेड्यापासून आग्नेयेस तीन किमी.वर पाल नावाची घुमटाकार टेकडी आहे. कराडच्या पूर्वेस पाच किमी.वर शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला सदाशिवगड हा डोंगरीकिल्ला आहे. वर्धनगड श्रेणीच्या पश्चिमेकडील एका फाट्याच्या टोकावर हा किल्ला आहे. कराडच्या वायव्येस सहा किमी.वर वसंतगड आहे.

माण तालुक्यात वारुगड, खोकडा, शिखर-शिंगणापूर, ताथवडा (संतोषगड), जिरे-पठार, कुळकजाई आणि महिमानगड या प्रमुख टेकड्या आहेत. त्यांपैकी वारुगड, ताथवडा व महिमानगड टेकड्यांवर गडाची तटबंदी आहे. दहिवडीच्या ईशान्येस २१ किमी.वर शिखर-शिंगणापूर टेकडी असून तिच्या मध्यावर शिंगणापूर खेडे व महादेवाचे मंदिर आहे. खटाव तालुक्यात सोलकनाथ, भापशाह, वर्धनगड आणि भूषण गड्या चार टेकड्या आहेत. वडूजच्या उत्तरेस २९ किमी.वर सोलकनाथ टेकडी असून त्यात येरळा नदी उगम पावते. वडूजच्या पश्चिमेस २२ किमी.वर वर्धनगड आहे. या गडाची टेकडी महादेव श्रेणीचाच एक भाग असून तिचा माथा गोलाकार आहे. टेकडीच्या दक्षिणेकडून सातारा–पंढरपूर रस्ता जातो. वडूजच्या नैर्ऋत्येस १८ किमी. वर सपाट माथ्याचा, पण प्रपाती उताराचा खडकाळ भूषणगड किल्ला आहे.

सह्याद्रीत काही ठिकाणी खिंडी किंवा ग्रीवा आढळतात. त्यातून घाटमार्ग काढलेले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही घाट महत्त्वाचे ठरले आहेत. खंबाटकी (पुणे–बंगलोर महामार्ग), पसरणी (वाई–महाबळेश्वर), आंबेनळी व पारघाट (महाबळेश्वर–महाड), कुंभार्ली (कराड–पाटण–चिपळूण) हातलोट आणि वासोळ्याच्या दक्षिणेस असलेला उत्तर तिवरा घाट हे जिल्ह्यातील प्रमुख घाट आहेत.

जिल्ह्यातील जमिनीच्या प्रतवारीत प्रादेशिक भिन्नता आढळते. महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई, जावळी व पाटण तालुक्यांच्या पश्चिम भागात जांभी मृदा आढळते. डोंगर उतारावरील मृदेच्या थराची जाडी कमी आहे; परंतु पावसामुळे डोंगराळ भागातून वाहत आलेल्या वनस्पतीजन्य पालापाचोळ्यामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेल्या खाचरांमध्ये सुपीक मृदा तयार झाल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी, कोयनाव केरा नद्यांच्या खोर्‍यात गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. कृष्णा खोर्‍यातील मृदा ही दख्खनच्या पठारावरील विशेष सुपीक मृदा समजली जाते. त्यांपैकी सातारा व कराड तालुक्यांतील कृष्णा काठच्या जमिनी अत्यंत सुपीक आहेत. नीरा व तिच्या उपनद्यांच्या खोर्‍यातील मृदा चांगल्या प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव तालुक्यांच्या डोंगरी परिसरातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे, नाले यांच्या दरम्यान माळरानाचे पट्टे आढळतात.
नद्या

सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णाही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना ह्या उजवीकडील आणि वसना व येरळा ह्या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णानदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी सातार्‍याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते. कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे.

कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.
प्रीतिसंगम

कर्‍हाड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कर्‍हाडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कर्‍हाडच्या (सातारा जिल्ह्याच्याही) शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणार्‍या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रिपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.
हवामान

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३५ सेंमी. असून जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋर्त्य मोसमी वार्‍यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे वितरण बरेच असमान आहे. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६२५ सेंमी. असून खटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील तालुक्यांत ते सुमारे ६० सेंमी.पेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.
वनस्पती व प्राणी

सातारा जिल्ह्यातील १,५२४ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यांपैकी १,३६९ चौ. किमी. राखीव, ४८ चौ. किमी. संरक्षित व १०७ चौ. किमी. क्षेत्र अवर्गीकृत वनांखाली आहे. महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ही वने एकवटलेली आहेत. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरित वने, तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोर्‍यात व जावळी तालुक्यात सुमारे ४२४ चौ. किमी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबट्या, गवा, रानडुक्कर, अस्वल, सांबर इ. प्राणी आहेत. मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.

कोयना नदीचे खोरे व कोयना धरणाचा परिसर, महाबळेश्वर, पाचगणी व पाटण परिसरात असलेली वनसंपदा, त्याच्या माध्यमातून होऊ घातलेला व्याघ प्रकल्प, कास, बामणोली, तापोळा परिसर आणि त्या भागात आढळणार्‍या औषधी वनस्पती या सर्व सातारा जिल्ह्याच्या वैभवाच्या बाबी आहेत. जगभरातील जैव विविधता असलेल्या स्थळांना मानवाकडून धोका आहे. त्यात पश्चिम घाटातील विविध स्थळांबरोबरच सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीचाही समावेश होतो. येथील धोक्यात येत असलेली पर्यावरणीय परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जैव विविधतेने नटलेला हा भाग पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसर (इको सेन्सेटिव्ह झोन) होणे ही काळाची गरज आहे.पश्चिम घाटातील विविध स्थळांचा ‘जागतिक वारसा स्थळांत’ (वर्ल्ड हेरिटेज साइट) समावेश होण्यासाठी भारताच्या केंद्रीयवन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव ‘दि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन’ला (युनेस्को) पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या द्विसदस्यीय तज्ज्ञ पथकाने पश्चिम घाटातील जवळपास ३५ स्थळांना भेट दिली. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पुष्प पठार म्हणून नावलौकिक मिळालेले कास पठार, कोयना वन्य जीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान या स्थळांची डॉ.स्ट्राहम व डॉ. फर्ज या युनेस्कोच्या सदस्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये पाहणी केली. युनेस्कोच्या मंजुरीमुळे (२०१२) सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कासपठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण औषधी व दुर्मी ळ वनस्पती, जंगली व सरपटणारे प्राणी, कीटक आदींचे अधिक शास्त्रीय पद्घतीने संरक्षण-संवर्धन करणे शक्य होणार आहे. नैसर्गिक वारसा जपण्याबरोबरच जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधल्याने निसर्गपूरक पर्यटनास चालना मिळू शकेल.
इतिहास

अश्मयुगीन व ताम्र-पाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा-कोयना नदीखोर्‍यात आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती; मात्र जिल्ह्यात विस्तृत उत्खनन व शास्त्रीय दृष्ट्या अन्वेषण झालेले नाही. सातवाहनांची सत्ता या प्रदेशावर इ.स.पू. सुमारे २०० ते इ. स.३०० या काळात होती. तत्कालीन वरवंटे, जाती, खापरे इत्यादी अवशेष वाईच्या किवरा ओढ्याच्या परिसरात आढळले आहेत. तसेच या काळात काही हीनयान बौद्घलेणी कराड-वाई (लोहारे) येथे खोदली गेली असून शिरवळ, कुंडल, भोसे, माळेवाडी आदी ठिकाणी त्याकाळी गुंफा खोदल्या होत्या. भारहूत (मध्यप्रदेश) स्तूपाच्या अभिलेखात करहाटक (कराड) येथील यात्रेकरूंनी अनुदान दिल्याचा उल्लेख आढळतो. सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती; हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्तसम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपलाभाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी.या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी. शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते; तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८–६१), निजामुद्दीन (कार. १४६१–६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३–८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली. प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता; पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८) नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता .

(१९४७).स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रे स समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले, त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्घतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत दैदीप्यमान शिखर म्हणजे सातार्‍याचे प्रतिसरकार होय. स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले.* फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले आहे.

ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कर्‍हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कर्‍हाडमध्ये झाले होते. ऑलिंपिकला जाण्यासाठी कर्‍हाडमधील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले होते.

ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोहोंनी आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला आहे.

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply