Amazon Big Sell

पंतप्रधान रोजगार हमी योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : पंतप्रधान रोजगार हमी योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : आरईजीपी/पीएमईजीपी/योजना/२००८-९ दिनांक ९/१०/२००८.
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत
योजनेचा उद्देश :
 • १) ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
 • २) ग्रामीण व शहरी बेरोजगार तरूण वर्गाला व पारंपारीक कारागीरांना एकत्रीत करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
 • ३) ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपारीक कारागीरांचे स्थलांतर थांबविणे व ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वसाधारण संवर्गातील लाभार्थी. राखीव संवर्ग- अनुसूचीत जाती –अनुसूचीत जमाती-अल्पसंख्याक-इतर मागास वर्ग- महिला-माजी सैनिक अपंग.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत रू.१०.०० लाखपेक्षा जास्त असल्यास तसेच सेवा उद्योगामध्ये प्रकल्प किंमत रू.५.०० लाख असेल तर किमान शैक्षणिक पात्रता इय्यता ८ वी पास आसणे आवश्यक.
 • अर्जदाराचे किमान वय १८ पूर्ण झालेले असावे.
 • अर्जदाराने केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
 • केवळ नवीन उद्योजक,कारागीर, संस्था व बचत गट या योजनेचा लाथ घेण्यास पात्र.
आवश्यक कागदपत्रे :
 • १) अर्ज दोन प्रतींमध्ये
 • २) प्रकल्प अहवाल दोन प्रतींमध्ये
 • ३) शैक्षणीक पात्रतेचे दाखले
 • ४) अनुभव अथवा प्रशिक्षण असल्यास त्यासंबंधीचा दाखला
 • ५) जातीचे प्रमाणपत्र (जिथे आवश्यकता असेल तिथे)
 • ६) मशिनरी-हत्यारे-औजारे दरपत्रके
 • ७) ग्रामपंचायत ना हरकत दाखला
 • ८) लोकसंख्येचा दाखला
 • ९) ज्या जागेत व्यवसाय करावयाचा त्या जागेची कागदपत्रे
 • १०) जागा भाडयाची असल्यास भाडे करारपत्र
 • ११) विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याचा पुरावा प्लॅन एस्टीमेट
 • १२) उद्योजकाचे छायाचीत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड
 • १३) रू.१,००,००० लाखपेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्यासाठी प्रकल्प अहवाल.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • सर्व साधारण संवर्गातील लाभार्थी – २५ टक्के
 • राखीव संवर्ग अनुसुचीत जाती – ३५ टक्के
 • अनुसूचीत जमाती – ३५ टक्के
 • अल्पसंख्यांक – ३५ टक्के
 • इतर मागासवर्ग – ३५ टक्के
 • (महिला- माजी सैनिक-अपंग – ३५टक्के )
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (सन २०१६-१७)
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : १०० ते १२० दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित जिल्हा कार्यालये
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.pmegp.in/www.kvic.org.in
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply