पत्रलेखनासंबंधी थोडी माहिती

अनौपचारिक पत्र

आई, वडील, भाऊ, बहीण व इतर आप्त , मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे म्हणजे अनौपचारिक पत्र.

– पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख घालावी.
– पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.
– पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.
– पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. आईवडिलांना ‘शिरसाष्टांग नमस्कार’ किंवा ‘शि.सा. नमस्कार’ आणि कुटुंबातील इतरांना सा.न. / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.
– समारोपाचा योग्य मायना असावा.
– पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.

औपचारिक पत्र

कार्यालयातील कामासंबंधी त्रयस्थ व्यक्तींना, शासकीय / खाजगी कंपन्यांना लिहिलेली पत्रे म्हणजे औपचारिक पत्र.

– व्यावसायिक पत्रात, पत्राच्या वरच्या भागात ‘।।श्री।।’ वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही.
– पत्राची सुरुवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.
– पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.
– त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तोसुद्धा लिहावा.
– योग्य, नेटक्या शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.
– ‘आपला विश्वासू’ ‘आपला कृपाभिलाषी’ या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply