Amazon Big Sell

पिलीवचा किल्ला

पंढरपूर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यात पिलीव नावाचे एक गाव आहे. गावाच्या मागील टेकडीवर पिलीवचा किल्ला आहे. किल्ल्याचा एकंदरीत आकार पाहाता ही गढी असावी. किल्ला सुस्थितीत असून आतमध्ये वस्ती आहे.

किल्ल्याच्या चारही टोकाला भव्य बुरुज आहेत. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्‍यांसाठी असणार्‍या देवड्या पाहायला मिळतात.

प्रवेशद्वारासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या दरवाजातून आत शिरुन उजव्या हाताला गेल्यास बुरुजाखाली बनवलेली एक मोठी खोली पाहायला मिळते. या खोलीला दोन झरोके आहेत.

बुरुजाखालील या खोलीत बसून टेहाळणी केली जात असावी. सध्या वटवाघळांची वस्ती या खोलीत आहे. हा बुरुज पाहून पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणारा जीना लागतो. या जीन्याने फांजीवर आल्यावर बुरुजावर जाता येते.

चारबाजूच्या चार भव्य बुरुजांवर जाण्यासाठी अरुंद दरवाजा आहे. या दरवाजातून पायर्‍या चढून बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर १२ मीटर आहे. बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. बुरुजाच्या दुसर्‍या बाजूला फांजीवर उतरण्यासाठी अरुंद दरवाजा व जीना आहे. मधल्या बुरुजावर एक छोटी ४ फुटी तोफ आहे. किल्ल्यात वस्ती असल्यामुळे बाकीचे जुने अवशेष आता नामशेष झाले असावेत.

Asha Transcription

About admin

Check Also

किल्ले रोहिडेश्वर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ …

Leave a Reply

Your email address will not be published.