loading...

पूर्णगड

रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगडाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

loading...

मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे.

किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्‍यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.

येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. *किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.

गडामध्ये गडकर्‍यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो.

admin

Leave a Reply

Next Post

प्रचितगड

Fri May 3 , 2019
आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले. loading... वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: