पृथ्वी मुद्रा

कृति
– प्रथम अनामिकेचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी टेकवून हलका दाब द्यावा.

– बाकीची इतर बोटे सरळ राहू द्यावी.

लाभ
– वाढत्या वयानुसार आपली गात्रे शिथिल व्हायला लागतात व आपल्याला पूर्वीसारखे काम होत नाही असे जाणवते. तेव्हा ही मुद्रा केल्यास बरे वाटते.
– आपल्याला आजारपणानंतर जर अशक्तपणा आलेला असेल तर ही मुद्रा केल्यास तो कमी होतो.
– व्यक्तीचे वजन हे आदर्श असे पाहिजे. जर आदर्श वजनापेक्षा कमी वजन असेल तर शारीरीक मानसिक थकवा येतो, चपळपणा कमी होतो, उत्साह वाटत नाही. अशा वेळी सकाळ संध्याकाळ पद्मासनात बसून कमीत कमी पंधरा मिनीटे तरी ही मुद्रा करावी. तिचा फायदा होतो.
– ज्या व्यक्ती अशक्त व बारीक असतात, त्यांच्यासाठी ही मुद्रा फारच फायदेशीर आहे.
– तेव्हा आपली मुद्रा बरोबर झाली आहे, असे आपण समजू शकतो.
– अनामिकेच्या अग्रभागी हलकी नाजूक उडणारी नाडी आपल्या अंगठयाला जाणवली पाहिजे.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply