Home / Maharashtra Tourism / फणसाड अभयारण्य
फणसाड अभयारण्य

फणसाड अभयारण्य

फणसाड अभयारण्य

फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रामधील अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात १९८६ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौ. कि. मी. आहे.

हे फणसाड अभयारण्य मुरुड अणि रोह तालुक्यांत येते. काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव वळास्ते, सर्वा, सुपेगाव आदी ३८ गावांनी ते वेढले आहे. हे अभयारण्य समुद्रकिनार्‍यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २५ फेब्रुवारी १९८६ रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला.

फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे ७०० प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे प्राणी आणि ९०हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे आहेत. अभयारण्यात चिखलगाण, धरणगाण फणसाडगाण आदी ३० पाणस्थळे आहेत. अभयारण्याच्या जवळच अलिबाग-मुरुड रोडवरील बोर्ली येथून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेला फणसाड धबधबा आहे.

नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती आहेत. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते. वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो.

महराष्ट्र राज्य शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संखेत दिसते. महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह असलेले शेकरू येथे आहेत. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्श येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप या अभयारण्यात आहेत. धनेश पक्षी हा या अभयारण्यात हमखास दिसतो.

सोयी

सुपेगाव वनविभागाचे व्हाईट हाऊस तंबू रहाण्यासाठी मिळतात. शिवाय खासगी निवास व्यवस्थाही आहे. बचत गटाच्या महिलांच्या हातचे जेवण येथे उपलब्ध आहे.

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३6 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. या जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.

प्रसिद्ध व्यक्ती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,

महर्षी धोंडो केशव कर्वे

विनायक दामोदर सावरकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामहोपाध्याय पां वा. काणे,

श्रीमान भागोजिशेठ बा. किर

प्रेक्षणीय स्थळे

आंबडवे

रत्‍नागिरी (शहर)

गणपतीपुळे

गुहागर

चिपळूण

जयगड

नाणीज

पावस

पूर्णगड

माचाळ

मार्लेश्वर

शेरीवली

संगमेश्वर

रत्‍नागिरी जिह्यातील गड-किल्ले

१. आंबोळगड

२. गोपाळगड

३. गोविंदगड

४. जंगली जयगड

५. जयगड

६. पालगड

७. पूर्णगड

८. प्रचितगड

९. भवानीगड

१०. महिपतगड

११. महीमंडणगड

१२. यशवंतगड

१३. रत्‍नदुर्ग

१४. रसाळगड

१५. विजयगड

१६. सुवर्णदुर्ग

शेती

रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते.

Check Also

lenyadri girijatmaj

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात …

vighneshwar ozar

विघ्नेश्वर ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात …

mahaganpati rangangav

महागणपती रांजणगाव

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर …

siddhivinayak siddhatek

सिद्धिविनायक सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. …

Leave a Reply