बल्लाळेश्वर गणेश मंदिर (पाली)

बल्लाळेश्वर गणेश मंदिर (पाली)

जे भक्त अष्टविनायक यात्रा करायला जातात त्यांना दोन मार्गांनी येथे पोहोचता. येथे पहिला मार्ग रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथून आहे आणि दुसरा मार्ग सुधागड तालुक्यातील पाली येथून आहे. खंडाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खोपोली येथून हे ठिकाण जवळ आहे.

अष्टविनायकातील आठ गणपतींपैकी पालीचा बल्लाळेश्वर हा तिसरा गणपती आहे. मंदिरासमोर दोन तलाव आहेत. देवळाच्या गाभाऱ्यात गणेशाची तीन फूट उंचीची मूर्ती आहे. तेथे एक पंचधातूंनी घडविलेली मोठी घंटादेखील आहे. अशीच एक घंटा भीमाशंकर येथेही पाहायला मिळते. मंदिराशेजारीच सरसगड आहे. किल्लेप्रेमी यावर दोन मार्गांनी जाऊ शकतात. पहिला मार्ग रामाळी, देऊळवाडीच्या उत्तेरेकडून आणि दुसरा मार्ग दक्षिणेकडून जातो. उत्तरेकडच्या मार्गावर पायऱ्या बांधलेल्या आहेत. अर्ध्या किलोमीटरवरून किल्याच्या प्रवेशद्वाराचे बुरुज दिसतात. किल्यात तलाव आहे, त्यात बारमाही पाणी असते. किल्यात वर जाण्यासाठीचा दक्षिणेकडील मार्ग अधिक प्रसिद्ध आहे. तेथे दगडात ९६ पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. पायऱ्यांची संख्या कमी असली तरीही प्रत्येक पायरी दीड ते दोन फूट उंच असून चढण्यासाठी फारच कठीण आहेत. १३०० फूट उंच असलेल्या या किल्या वरून अंबा नदी, सुधागड, कर्नाळा, माणिकगड, बदृतीन किल्ला हे कोकणातील किल्ले आणि कोरीगड, घणगड, तेलबैल्या, नागफणी हे घाट विभागातील किल्ले दिसतात. येथील गरम पाण्याची कुंडेही पर्यटकांना पाहता येतात.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात सुवर्ण गणेशाचे मंदिर आहे. समुद्र किनारी असलेले हे मंदिर नारळ-पोफळीच्या झाडांमध्ये लपलेले आहे. अरबांच्या् आक्रमणापासून वाचविण्यासाठी सुवर्ण गणेशाला जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते. नंतर १९९७ साली या मूर्ती पुन्हा सापडल्या. ही गणेशमूर्ती शिलाहार काळातील शैलीतील आहे, त्यावर सुंदर कोरीवकाम करण्यात आले आहे.
जीवदानी मातेचे मंदिर देशभरात प्रसिद्ध असून तेथे जाण्यायसाठी १३७५ पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर शहराच्या पूर्व भागात आणि डोंगरमाथ्यावर आहे. नवरात्रौत्सवात येथे फार गर्दी असते. या भागातील बरेच लोक विशेषत: आगरी, मांगेला, कोळी आणि भंडारी लोक देवीला कुलदैवत म्हणून पूजतात. पायथ्याशी असलेले पापडचखंडी धरण येथील शुद्ध पाण्याचा स्रोत आहे.

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply