Amazon Big Sell

भामेर किल्ला

धुळे जिल्ह्यात असणार्‍या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला, भामेर गावाभोवती नालेच्या आकारात (U) पसरलेला आहे. या किल्ल्याने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार बांधून, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला पूर्ण संरक्षित केले आहे. असा हा नितांत सुंदर किल्ला (आणि गाव) प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे असा आहे. बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गडावर यात्रा भरते.

भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रवती नगर होते, तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय.प्राचीनकाळी सुरत – बुर्‍हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाइ. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे.

अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता. किल्ल्यावरील १८४ लेणी (गुंफा) याच काळात खोदल्या गेल्या असाव्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

2 comments

  1. Pingback: w88win

  2. Pingback: Cryptonia Market

Leave a Reply