भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती ) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना.

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती ) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजना.
योजने बद्दलचा शासन निर्णय : साप्रोयो -2015/ प्र.क्र.133/उद्योग-8
योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
योजनेचा उद्देश : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 व्या जयंती निमित्‍त राज्यातील (अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती) उद्योजकांना उत्तेजन देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आर्थिक दृष्टया स्वावलंबी करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती उद्योजकांना सुक्ष्म, लघु व मध्यम प्रकारचे वस्तू उत्पादन व माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उद्योग सुरू करण्यासाठी
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) अनुसुचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या उत्पादन उद्योगांसाठी प्रचलित सामुहिक प्रोत्साहन योजनेतील विहित निकषांची पूर्तता करत असल्यास खालील विशेष प्रोत्साहने अनुज्ञेय राहतील.
 • अ) प्रस्तुत योजनेंतर्गत अ व ब प्रवर्गातील क्षेत्रांना क प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील.घटकाच्या पात्रतेसाठी घटक ज्या क्षेत्रासाठी आहे त्याचे निकष विचारात घेतले जातील
 • ब) ) प्रस्तुत योजनेंतर्गत क व ड प्रवर्गातील क्षेत्रांना ड+ प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील.
 • क) ) प्रस्तुत योजनेंतर्गत ड+ प्रवर्गातील क्षेत्रांना नक्षलप्रवण क्षेत्र प्रवर्गातील लाभ अनुज्ञेय राहतील.
 • ड) उपरोक्त लाभ सामुहिक प्रोत्साहन योजना,२०१३ अंतर्गत नवे व विस्तारीत उत्पादन उद्योगांना लागू राहतील.
 • इ) अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती उद्योजकांना राज्य शासनाच्या अथवा केंद्र शासनाच्या अन्य योजनांचा लाभ देखील घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे : संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • 1)प्रस्तुत योजनेद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी असलेल्या औद्योगिक प्लॉट पैकी 20% प्लॉट व 30% सवलतीच्या दराने देण्याची तरतूद आहे.
 • 2) उद्यम भांडवल निधी
 • 3)योजनेत घटक ज्या तालुका प्रवर्गात आहे त्यापेक्षा निम्न प्रवर्गातील तालुक्याचे लाभ देण्यात येतील.
 • 4)योजनेतील सुक्ष्म, लघु व मध्यम गटातील नवीन निर्मीती पात्र उद्योगांना भांडवली गुंतवणूकीच्या 15 ते 30 टक्के भागभांडवल अनुदान (15 ते 30 लाख मर्यादा.
 • 5) वीज शुल्क अनुदान-योजनेतील सुक्ष्म,लघु व मध्यम गटातील उद्योगांना उत्पादनाच्या दिनांकापासून वीज वापर व भुगतान केल्यावर 5 वर्षाकरीता रू. 1 ते 2 प्रती युनिट वीज अनुदान अनुज्ञेय राहील.
 • 6) व्याज अनुदान.
 • 7) 10 समूह औद्योगिक विकास गट स्थापन करून त्यांना पायाभूत सूविधा देणे.
 • 8)उबवन केंद्राची स्थापना ( Incubation centre)
 • 9)प्रत्येक तालुक्यातील एक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकाची निवड करुन प्रारंभिक स्तरापासून उद्योग उभारणीपर्यंत ते उद्योग यशस्वीरित्या चालवणे व त्यातून शाश्वत लाभ मिळेपर्यंत सहाय्य करणे.
 • 10)कौशल्य विकास योजना
 • 11)प्रदर्शन व विक्री
अर्ज करण्याची पद्धत : संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : —–
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा उद्योग केंद्र व उद्योग संचालनालय, मुंबई.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

8 comments

Leave a Reply