भूपाळगड

भूपाळगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या बाणूर गावामुळे या किल्ल्याला “बाणूरचा किल्ला” म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे.

पूर्व आणि उत्तरेकडे साधारण ७०० फूट उंच कडे आहेत. पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही. बाणूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे. सध्या किल्ल्यातच गाव वसलेल आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याने गाडी घेऊन थेट किल्ल्यावर जाता येते.

भूपाळगड हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर होता. या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होते असा उल्लेख आहे. १६७९ मध्ये संभाजी राजे मुघलांना जाऊन मिळाले. दिलेरखानाने त्यांना फौज देऊन भूपाळगड किल्ला घेण्यास सांगितले. संभाजी राजे गडावर चालून आलेले पाहून किल्लेदार फिरंगोजीने प्रतिकार केला नाही.

तो गड सोडून पन्हाळगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. किल्ला घेतल्यावर मुघलांनी किल्ल्यातील मावळ्यांचे हात पाय तोडले.

बाणूर गावातून किल्ल्यावर प्रवेश करताना एक उंचवटा/छोटी टेकडी आपले लक्ष वेधून घेते. या टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे.

या टेकडीजवळच एक पाण्याचे छोटे कोरडे टाके आहे. दक्षिणेकडे पाण्याचा मोठा तलाव आहे. तटबंदीत २ ते ३ दिंडी दरवाजे (चोर दरवाजे) आहेत. किल्ल्यावर सर्वत्र तुटलेल्या रचीव तटबंदीचे अवशेष दृष्टीस पडतात.

admin

Leave a Reply

Next Post

रामदुर्ग

Fri May 3 , 2019
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला “रामदुर्ग” विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. […]
WhatsApp chat
%d bloggers like this: