loading...

भूषणगड

भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते आहेत. गडाची गडदेवता हरणाईमाता ही अनेकाच्या श्रद्धास्थानी आहे.

loading...

भूषणगड गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे. येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. भक्तांच्या अर्थसहाय्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे.

समुद्रसपाटीपासून ९०४ मीटर उंच असलेला भूषणगड चढण्यासाठी पायथ्यापासून २० मिनिटे लागतात. दरवाजाच्या २५ फूट खाली एक वाट तटबंदीच्या खालून उजवीकडे जाते. गडाच्या पश्चिम बुरुजाला वळसामारुन ती मागच्या बाजूच्या मंदिरापर्यंत जाते.

तेथे घुमटीवजा मंदिर आहे. घुमटीमधे देवीची मूर्ती असून तिचे नाव भुयारी देवी आहे. येथून पुन्हा फिरुन दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर आहे.

येथून दरवाजाची बांधणी दिसते. पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतल्या बाजूला दरवाजा घेवून दोन्ही बुरुजांच्या कह्यात तो ठेवला आहे. वळणदार मार्गावरच्या या दरवाजावर खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते.

दरवाजाची कमान पडलेली आहे. येथून पुढे गेल्यावर सरळ वाट पश्चिम कड्यावर जाते. तर डावीकडील वाट माथ्याकडे जाते. भूषणगडाचा एकूणच विस्तार लहान आहे.

माथा चारही अंगाने तटबंदीने सुरक्षीत केलेला असून जागोजागी पहार्‍यासाठी बुरुज बांधले आहेत. गडावर सुशोभिकरणासाठी लावलेल्या झुडूपांनी आता तटबंदी व घरांची जोती आच्छादली गेली आहेत. भूषणगडाचा आकार साधारण त्रिकोणी आहे. या तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत.या तिन्ही टोकांच्या मध्यभागी उंचवटा असून त्यावर हरणाई मातेचे मंदिर आहे.

पुर्वी हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली होते. ते आता उचलून पातळीवर नव्याने बांधले आहे.मंदिरासमोर दिपमाळ आहे. मंदिराच्या बाजूलाच धर्मशाळा असून मुक्काम करणार्‍यांची सोय होवू शकते.

भूषणगडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. येथून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही दृष्टीस पडतात.

admin

Leave a Reply

Next Post

मधू-मकरंद गड

Fri May 3 , 2019
वाई महाबळेश्वरच्या मार्गे आंबेनळीच्या घाटातून, शिरवली-हातलोट रस्त्याने हातलोट आणि घोणसपूर या पायथ्याच्या गावातून मधू-मकरंद गड असे हे जोडकिल्ले दिसतात. loading... परंतु आज मधुगडावर जाण्यासाठीचा रस्ता शिल्लक नाही.घोणसपूर गावात पोहोचल्यावर गडाच्या माथ्यावर मल्लिकार्जुनाचं देऊळ लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मल्लिकार्जुन शंकराचे मंदीर आहे, मुक्कामासाठी हे मंदिर चांगले ठिकाण आहे. येथे दरसाली […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: