७ |
आवश्यक कागदपत्रे : |
- 1. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी इरादापत्र
- 1. अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज.
- 2.जागेचे दस्तऐवज (7/12)/ अर्जदार जमिनीचा मालक -नसल्यास
- अ. जमिनधारकाशी केलेला करारनामा.
- ब. जागेचे ताबापत्र.
- 3.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
- 4.सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा (Approvad Building Plan) / स्थानिक संस्थेकडील/मुंबई महानगर पालिकेकडील इंटोमेशन ऑफ डिसऍ़प्रुव्हल (IOD – Intimation of Disapproval)/ सक्षम प्राधिकरणाने बांधकाम सुरु करण्यास (Commencement Certificate) दिलेली परवानगी.
- 5.प्रमाणित वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी वापरावयाच्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
- 6. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity) व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मिती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
- 7. विहित नमुन्यातील शपथपत्र.
- 8. विकासक संस्थेच्या प्रकल्पाची माहिती विहित नमुन्यात.
- 9.विकास संस्थेचे नेटवर्थ (C.A. Certified) प्रमाणीत करून
- 2. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी De-novo इरादापत्र
- 1. इरादापत्र व मुदतवाढीच्या प्रती.
- 2.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
- 3. सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा (Approvad Building Plan) / स्थानिक संस्थेकडील/मुंबई महानगर पालिकेकडील इंटोमेशन ऑफ डिसऍ़प्रुव्हल (IOD – Intimation of Disapproval)/ (Commencement Certificate) दिलेली परवानगी. /Occupation Certificate.
- 4. प्रमाणित वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी वापरावयाच्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
- 5. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity) व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मिती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
- 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
- 3. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी स्थायी नोंदणी
- अ) इरादापत्राच्या आधारे नोंदणीसाठी :-
- 1.सक्षम प्राधिकरणाने बांधकाम पूर्ण झाल्या बाबत (Building Completion Certificate) दिलेले प्रमाणपत्र / सक्षम प्राधिकरणाने बांधकाम राहण्यांस योग्य असल्या बाबत (Occupancy Certificate)पूर्ण झाल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र.
- 2.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
- 3.सनदी वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी व प्रत्यक्ष वापरात असलेल्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
- 4.वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity)व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मीती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
- 5. माहिती तंत्रज्ञान घटकांची जागे बाबत केलेले नोंदणीचे दस्तावेज व सक्षम प्राधिकारीने दिलेले मा.तं./मा.तं सा.से घटकाचे इरादापत्र/नोंदणीपत्र.
- 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
- ब) थेट नोंदणीकरीता खालील कागदपत्रे :
- 1. विहित नमून्यातील अर्ज
- 2.सक्षम प्राधिकरणाने बांधकाम पूर्ण झाल्या बाबत (Building Completion Certificate) दिलेले प्रमाणपत्र / सक्षम प्राधिकरणाने बांधकाम राहण्यांस योग्य असल्या बाबत (Occupancy Certificate)पूर्ण झाल्य्या बाबत दिलेले प्रमाणपत्र.
- 3. रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
- 4. सनदी वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी व प्रत्यक्ष वापरात असलेल्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
- 5. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity)व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मीती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
- 6. माहिती तंत्रज्ञान घटकांची जागे बाबत केलेल नोंदणीचे दस्तावेज व सक्षम प्राधिकारीने दिलेले मा.तं./मा.तं सा.से घटकाचे इरादापत्र/नोंदणीपत्र.
- 7. अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज.
- 8. जागेचे दस्तऐवज (7/12)/ अर्जदार जमिनीचे मालक –नसल्यास
- अ. जमिनधारकाशी केलेला करारनामा.
- ब. जागेचे ताबापत्र.
- 9. विहित नमुन्यातील शपथपत्र
- 4. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाला अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक :-
- 1. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती/चलन.
- 2. उद्योग संचालनालयाकडून प्राप्त केलेल्या इरादापत्राची प्रत.
- 3. सक्षम प्राधिकरणांने माहिती तंत्रज्ञान वापरासाठी मंजूर केलेला बांधकाम आराखडा.
- 5. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्र/ नोंदणी प्रमाणपत्रातील नाव/ बांधकाम क्षेत्रफळ इ. संदर्भात सुधारणा
- 1. उद्योग संचालनालयाकडून प्राप्त केलेल्या इरादापत्राची प्रत.
- 2. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती चलन.
- 3. सक्षम प्राधिकरणांने मंजूर केलेला सुधारित बांधकाम आराखडा.
- 4.नावात अथवा व्यवस्थापनात बदल करावयाचा असल्यास तसे त्यासंबंधीचे कंपनीचा ठराव.
- 6. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्राची मुदतवाढ
- 1. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती चलन .
- 2.उद्यानाच्या ईमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीबाबत सनदी वास्तुरचनाकाराचे प्रमाणपत्र व बार चार्ट (Bar Chart).
- 3.सहामाही प्रगती अहवाल.
- 4.कंपनी नेट वर्थ व ताळेबंद.
- 5.विकासकाने कंपनीची प्रकल्पाची माहिती.
- 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
- 7: माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना मुद्रांक शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र
- 1. विहीत नमुन्यात नोंदलेले प्रतिज्ञापत्र.
- 2.उद्योग नोंदणीची सत्यप्रत / अथवा अन्य ग्राहय नोंदणीची सत्यप्रत.
- 3.खरेदी करावयाच्या जागेचा अलिकडचा 7/12 उतारा. (माहिती तंत्रज्ञान उद्यान/ म.औ.वि.मं. जागेकरिता आवश्यक नाही) /खरेदी करावयाच्या जागेचा नकाशा. (माहिती तंत्रज्ञान उद्यान जागेकरिता आवश्यक नाही)/ जागेच्या बांधीव मिळकत खरेदीसाठी साठेखताची सत्यप्रत किंवा म.औ.वि.म / माहिती तंत्रज्ञान उद्यान वाटप पत्र/ जागेच्या बांधीव मिळकतीच्या खरेदीखताच्या मसुदयाची प्रत.
- 4.नियोजित उद्योगाचा प्रकल्प अहवाल.
- 5.खरेदी करावयाच्या जागेत करावयाच्या नियोजित बांधकामाचा नकाशा.
- 6.बँकेच्या / वित्तीय संस्थेच्या गहाणखतासाठी कर्ज मंजुरी आदेशाची सत्यप्रत.
- 7.माहिती तंत्रज्ञान उद्यान/ एमआयडीसी बाहेरील उद्योगांनी स्थानिक नगरपरिषद, महानगरपालिका अथवा नगररचना विभागाचा प्रादेशिक नगररचना आराखडयाप्रमाणे झोनिंग दाखला सादर करावा किंवा औद्योगिक बिनशेती दाखला
- 8.मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरी करणा-या व्यक्तीला प्राधिकृत केल्याबाबत संचालक मंडळाचा ठराव, मुखत्यारपत्राची सत्यप्रत.
- 9.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटक म्हणून उद्योग संचालनालयाचे प्राधिकृत अधिकाऱ्या कडून इरादापत्र
- 8.माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना विद्युत शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र
- 1.विहीत नमुन्यात नोंदलेले प्रतिज्ञापत्र
- 2.जागेचा दस्ताऐवज , सेल डीड किंवा लीज डीड.
- 3.अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज
- 4.नियोजित उद्योगाचा प्रकल्प अहवाल
- 5.विद्युत शुल्क माफीची सवलत मिळण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरी करणा-या व्यक्तीला प्राधिकृत केल्याबाबत संचालक मंडळाचा ठराव, मुखत्यारपत्राची सत्यप्रत
- 6. पॉवर सँक्शन लेटर
- 7.महिन्याचे विजेचे बील.
- 8. घटक सुरु असल्याचे कागदपत्र/कार्यादेश प्रत (Work Order Copy)
- 9. इएलपी-1 फॉर्म
- 10.घटकाचे नोंदणी प्रमाणपत्र
|
८ |
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : |
- 1.सार्वजनिक व खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाना मूळ चटईक्षेत्र निर्देशांक 1.00 पेक्षा जास्त असला तरी 100% अथवा 200% अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक धरुन एकूण चटईक्षेत्र निर्देशांक 3.00 पेक्षा जास्त अनुज्ञेय असणार नाही इतका अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध करुन देण्यात येईल.
- 2. विशेष आर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना विद्युत शुल्क भरण्यापासून कायमस्वरुपी सूट साठी पात्र आहेत.
- 3. विशेष अर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना विद्युत शुल्क भरण्यापासून कायमस्वरूपी सूट साठी पात्र आहेत.
- 4.राज्यातील अ व ब क्षेत्राव्यतिरिक्त इतर वर्गीकृत क्षेत्रात स्थापित होणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान घटकांना वीज वापराच्या प्रति युनिट रु. 1 या दराने 3 वर्षपर्येत वीज वापर अनुज्ञेय राहील. (हार्डवेअरमधील गुंतवणूकीच्या अधिन राहून)
- 5. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीज दराच्या आदेशाच्या अधिन राहून औद्योगिक दराने वीज पुरवठा करण्यात येईल.
- 6.माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक (माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर आणि दूरसंचार हार्डवेअर उत्पादक घटक वगळून) कोणत्याही क्षेत्रात (रहिवासी, ना विकास क्षेत्रासह ) उभारणी करता येईल.
- 7. सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत वर्गीकरण करण्यात आलेल्या सी, डी, डी+, ना-उद्योग जिल्हे व नक्षलग्रस्त क्षेत्र येथील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक यांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
- 8.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामध्ये येणाऱ्या खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
- 9.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामध्ये येणाऱ्या सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
- 10.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामधील विशेष आर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना तसेच एसटीपीआयने मान्यता दिलेल्या नोंदणीकृ त माहिती तंत्रज्ञान घटकांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
- 11. राज्यातील नोंदणीकृत माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना त्यांचे विलीनीकरण/ विभक्त किंवा फेररचना झाल्यास, मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट देण्यात येईल.
- 12.अभिहस्तांकित भाडेपट्टयांना आणि कलम 36-ए खाली माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांच्या संमती व परवानगी (अनुज्ञा) करारनाम्यांना मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट देण्यात येईल.
- 13.उत्पादनावरील कार्यसंवेदा कर किमान दरानुसार आकारण्यात येईल.
- 14. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना जकात/ प्रवेश कर किंवा अन्य करातून सूट देण्यात येईल.
- 15.मा. तं. व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना निवासी दराने मालमत्ता कर आकरण्यात येईल.
- 16. मुल्यवर्धित कर किमान दरानुसार आकारण्यात येईल.
- 17.आयएसओ 27001 सुरक्षेसाठी आणि सीओपीसी व इएससीएम प्रमाणपत्रांसाठी झालेल्या खर्चापैकी 50 टक्के खर्चाची प्रतिपूर्ती जास्तीत जास्त रुपये 5 लाख, सामुहिक प्रोत्साहन योजनेतील सुक्ष्म व लघुस्तरावरील माहिती तंत्रज्ञान घटकांना करण्यात येईल.
- औद्योगिक सलोखा व पुरक वातावरण
- 1. दुकाने व आस्थापना अधिनियमाखालील तरतूदी शिथिल करण्यात आल्या आहेत.
- 2. भौतिक स्वरुपात हजेरी आणि वेतनविषयक नोंदवहया ठेवण्यातून सूट.
- 3. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक उत्पादन प्रक्रियेतून नि:स्त्रुत पाणी निर्माण करीत नाहीत व अशा घटकांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाना घेण्यापासून सूट असेल.
- 4. विशिष्ट क्षेत्रांचा विकास-ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसेच डेटा सेंटरचे प्रवर्तन.
- 5. माहिती तंत्रज्ञान घटकांना या धोरणाखाली देण्यात आलेले सर्व लाभ मिळण्यास एव्हीजीसी घटक पात्र राहतील.
- 6. हरित माहिती तंत्रज्ञानाचा विकास.
- 7. उत्पादनाचा कार्यकाल संपल्यावर ही उत्पादने मागे घेण्याचे निश्चित धोरण असणाऱ्या आणि ई-कचऱ्याकरीता पुनरुत्पादन प्रक्रिया वापरणाऱ्या घटकांना माहिती तंत्रज्ञान उत्पादने खरेदी करताना शासन प्राधान्य देईल.
- 8. राज्यात उद्योजकता, नाविन्यास आणि इन्क्युबेशन सेंटर्सची स्थापना करण्याकरिता एक मॉडेल व चौकट निश्चित करणे.
- 9. महाराष्ट्र ब्रँड विकसित करणे सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी आणि विशेषत: एव्हीजीसी शी संबंधित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देश-पातळीवरील व्यावसायिक परिसंवाद, प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांच्या महाराष्ट्रातील आयोजनास शासन पाठिंबा देईल.
- 10. ग्रामीण आणि निमशहरी भागात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओज) या उपक्रमांचे वाढीस उद्युक्त करणे
- 11. ललित कला विद्यालय / महाविद्यालय म्हणजे डिजिटल आर्ट सेंटरची स्थापना करणे
- 12. मुंबई / पुणे येथे सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर आधारीत ए. व्ही जी. सी सेंटर ऑफ एक्सलेंन्स ची स्थापना करण्यात येईल
- 13. एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरांची (आयआयटीटी) उभारणी करणे.
- आर्थिक सवलती :-एव्हीजीसी साठी आर्थिक सवलती :
- • व्हेंचर कॅपिटल फंड निर्माण करणे.
- • प्रमाणपत्र शुल्क परतावा
- • अॅनिमेशन चित्रपट निर्मितीसाठी भांडवली अनुदान
- • करमणूक कर भरण्यापासून सूट
- • भांडवली अनुदान
- • बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंगसाठी आर्थिक सवलती :
- • प्रशिक्षण अनुदान
- • नामांकित संस्थांकडून प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करणे
- • ग्रामीण व निमशहरी भागातील बी. पी. ओ. ना सुरक्षा ठेव / बयाणा रक्कम भरण्यापासून सूट देण्यात येईल.
|
९ |
अर्ज करण्याची पद्धत : |
|
१० |
अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : |
10 दिवस |
११ |
संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : |
- माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांनी नोंदणीसाठी खालील नोंदणी प्राधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
-
अ.क्र. |
माहिती तंत्रज्ञान घटकाचा प्रकार |
नोंदणी प्राधिकारी |
१. |
मोठे घटक |
|
- 1) उद्योग सह संचालक (मुंप्रावि)
- 2 ) विभागीय सह संचालक
- 3 ) अधिक्षकीय उद्योग अधिकारी (त्यांच्या अधिकार क्षेत्रात)
|
2 |
मुंबई प्राधिकरण विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सुक्ष्म , लघु, मध्यम आणि मोठे घटक. |
तांत्रिक सल्लागार |
3 |
वरील विभागाव्यतिरिक्त क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम घटक. |
1) उद्योग सह संचालक (मुंप्रावि) 2 महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ,(त्यांच्या अधिकार क्षेत्रात) |
4 |
विशेष आर्थिक क्षेत्रातील घटक |
विकास आयुक्त (सेझ) |
5 |
सॉफ्टवेअर सुक्ष्म,लघु आणि मध्यम घटक. |
संचालक, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स (एसटीपीआय) नवी मुंबई ,पुणे. |