Home / Maharashtra Tourism / महालक्ष्मी मंदिर मुंबई
महालक्ष्मी मंदिर

महालक्ष्मी मंदिर मुंबई

महालक्ष्मी मंदिर मुंबई

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत. या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. त्यांचे विनाआवरण दर्शन घ्यायचे असल्यास रात्री मंदिर बंद करताना जावे लागते. हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिराला लागूनच हार, फुले, प्रसाद व मिठाईची दुकाने आहेत. नवरात्री मध्ये या मंदिराला फुलांनी सजवले जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी खुप मोठी गर्दी उसळते. तसेच येथे जत्रा ही भरते.

महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी- एका माणसे किमान भाडे 10 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.

मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले असल्याचा समज आहे. मुळात मुंबादेवी ही मासे पकडणार्‍या कोळ्यांची देवता होती. तिचे देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट भागात होते. जेव्हा इंग्रजांनी तेथे व्हिक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्टेशन बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते देऊळ त्यांनी काढून टाकले आणि मुंबईच्या काळबादेवी-भुलेश्वर भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले.
घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्‍यापासून १० कि.मी. दूर आहेत.

इतिहास

एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी.त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.

महत्व आणि वैशिष्ट्ये

या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत.येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे.त्यात अनेक वेचक , निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात.या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह,गंगावतरण,तांडवनृत्य,अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.
भूगोल

एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किमी आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे.

प्रवास

घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणार्‍या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.

समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय.

मुख्य गुफा

मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात.

रावणानुग्रह

एका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.

विवाह मंडल

हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने सह्न्क्राची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घाल्ण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.

इतर उल्लेखनीय गुफा

इतर ठिकाणी मानवती पार्वती,गंगा अवतरण ,शिवशक्ती अर्धनारी,महायोगी शिव,ल्कुलीह्साची मूर्ती,भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात.

Check Also

lenyadri girijatmaj

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात …

vighneshwar ozar

विघ्नेश्वर ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात …

mahaganpati rangangav

महागणपती रांजणगाव

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर …

siddhivinayak siddhatek

सिद्धिविनायक सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. …

Leave a Reply