माझे पहिले भाषण 

आमच्या शाळेत विविध स्पर्धा नेहमी होत असत. त्याप्रमाणे आंतरशालेय स्पर्धांचीही रेलचेल असते. माझे अनेक दोस्त वैयक्तिक पारितोषिके,सांघिक ढाली मिळवून आणत असतात. त्यायोगे त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढत असतो. या साऱ्या स्पर्धांच्या धामधुमीत माझे काम असते केवळ श्रोत्याचे आणि टाळ्या वाजवायचे खरेतर मी कधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला न्हवत आणि कधी घेईल असेही वाटलेही न्हवते; पण स्वाभिमान दुखावला गेल्या मुले आणि संपूर्ण वर्गाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न (question) निर्माण झाल्यामुळे मी भाषणाला उभा राहिलो आणि चक्क मी माझे पहिले भाषण ठोकले
त्याचे असे झाले की, इयत्ता नववीच्या दोन तुकड्यांत, म्हणजे ‘ अ ‘ आणि ‘ बी ‘ या मध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी चुरस असते. अभ्यास, खेळ, इतर कलास्पर्धा, अभिनय,विकृत अशा स्पर्धांत हि चढाओढ चालू असते आणि चढाओढ लावण्यात आमच्या शिक्षकांनाही विशेष रस वाटत असावा !
एकदा आमच्या स्पर्धेला वर्गातील खांदे वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले विद्यार्थी बाहेरगावी वक्तृत्व स्पर्धेला गेले होते. नेमक्या त्याच काळात वक्तृत्वाच्या अंतरवर्गीय स्पर्धा जाहीर झाल्या. सरानी मग मलाच अकल्पितपणे स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे या वादावादीच्या लढाईत आमच्या वर्गाची खिंड लढवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
आजवर मी सभेत काढीत भाषण केले न्हवते, परंतु अभ्यास आणि वाचन बरे असल्याने भाषणाचे मुद्दे काढणे मला सहज शक्य झाले. मी भाषणाची व्यवस्थित तयारी केली. पण शे-दोनशे मुलांसमोर उभे राहून भाषण ठोकणे या कल्पनेनेच माझे पाय थरथरू लागले. अशा मन:स्तिथीतच मी भाषणासाठी उभा राहिलो. भाषणाचा विषय होता – ‘ आम्ही आमच्या वाडवडिलांपेक्षा सुखी असतो का ? ‘
खच्चून भरलेल्या त्या सभागृहात व्यासपीठावर उभा राहिलो मात्र, सर्व सभागृहाच आपल्याभोवती फिरत आहे, असा मला भास होऊ लागला. घशाला कोरड पडली. क्षणभर आवाज फुटेना; पण त्याक्षणी निराश झालेल्या आपल्या वर्गमित्रांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले मग मात्र मी निर्धारपूर्वक माझ्या भाषणाला सुरवात केली एकापाठोपाठ एक मुद्दे सुचत गेले. आजच्या पिढीचे कर्तृत्वाच्या कथा सांगून आम्ही आमचा वाडवडिलांपेक्षा सुखी आहोत,हाच माझा आशावादी द्रुष्टीकोन मी मांडला होता. माझ्यापूर्वी बोललेल्या वक्त्यांचे मुद्दे सुद्धा मी खोडून काढले. पाच मिनिटे केव्हा संपली ते कळलेच नाही.समोरील मित्रांच्या टाळ्यांच्या कटकडाटाने मी भावनांवर आलो. आणि काय आश्च्र्र्य ! या माझ्या पहिल्याच भाषणात मी बक्षिसपात्र वक्ता ठरलो.

admin

Leave a Reply

Next Post

आमच्या गावातील जत्रा

Wed May 8 , 2019
आमच्या गावातील रक्षणकर्ती देवता म्हणजे आमची ‘ मंगळाई ‘ मंगळाई देवीचे देऊळ गावाबाहेरील एका टेकलीवर आहे.देवळात जाण्याचा रास्ता जरा अरुंद आणि अवघडच आहे. तरीही गावकरी देवळात जाण्याचे कधीही चुकवत नाहीत. दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. हा मोठा उत्सवच असतो. त्या काळात गावात खूप पैपाहुणे येतात. जे गावकरी नोकरीधंद्याच्या निमत्ताने […]
WhatsApp chat
%d bloggers like this: