माती संवर्धन

पडकई विकास कार्यक्रम

अ.क्र.योजनासविस्तर माहिती
योजनेचे नाव :पडकई विकास कार्यक्रम
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1.शासन निर्णय क्रं.रोहयो 2009/प्र.क्र.50/रोहयो-1, दि.01/07/2009 पुणे व अहमदनगर जिल्हयासाठी मर्यादीत.
 • 2.शासन निर्णय क्रं. जलसं 2012/प्र.क्र.23/ जल-7, दि.05/03/2013 राज्यातील आदिवासी जिल्हयांसाठी.
योजनेचा प्रकार :राज्य योजना/विशेष केंद्रीय सहाय्य योजना
योजनेचा उद्देश :आदिवासी शेतकरी कुटुंबाचे जमिनीवर दगडी बांध लावून भात खाचरे तयार करण्याची योजना, पडीक क्षेत्राची सुधारणा करुन सदर क्षेत्र लागवडीखाली आणणे व भ्ंात पिकाखालील क्षेत्रात वाढ करुन भाताचे उत्पादन वाढविणे .
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :लाभार्थी आदिवासी शेतकरी असला पाहिजे
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. जमिनीचा उतार 8 ते 20 टक्के पर्यत असावा
 • 2. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1250 मि.मी. पेक्षा जास्त असावा.
 • 3. जमिन सपाटीकरणासाठी माती पुरेशी असावी.
 • 4. खाचरामध्ये बाहेरुन पाणी घेण्याची सोय असावी.
 • 5. आदिवासी शेतक-यांसाठी स्वत:च्या मालकीची शेतजमिन असावी.
 • 6. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्रय रेषेखालील असावा.
 • 7. वनकायदा अंतर्गत वनपट्टे हस्तांतरीत केलेल्या लाभाथ्र्याना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
 • 8. अपंग लाभाथ्र्यांना 3 टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात यावे.
आवश्यक कागदपत्रे :
 • (1) 7/12 उतारा,
 • (2) 8/अ,
 • (3)जातीचा दाखला,
 • (4) दारिद्रय रेषेचा दाखला
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :वैयक्तिक
अर्ज करण्याची पद्धत :

  तालुका कृषि अधिकारी यांचेकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे

  १०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
  ११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय
  १२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

  विशेष घटक योजना

  अ.क्र.योजनासविस्तर माहिती
  योजनेचे नाव :विशेष घटक योजना
  योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय क्रं.ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र.जलसं/1095/ प्र.क्र.250/07, दि.30/01/1996 नुसार एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम योजनेखाली अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत (विघयो) निधी वितरीत करण्यात येतो.
  योजनेचा प्रकार :राज्य योजना
  योजनेचा उद्देश :अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतक-यांचे शेतावर मृद संधारणाच्या उपचाराव्दारे जमिनीचा विकास करणे व त्यांचे शेती उत्पादनात वाढ करणे
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :अनुसूचित जाती/ नवबौध्द प्रवर्गातील
  योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1. लाभार्थी अनुसूचित जाती/ नवबौध्द प्रवर्गातील असावा.
  • 2. लाभार्थीच्या स्वत:चे नावे शेतजमिन असावी.
  आवश्यक कागदपत्रे :(1) 7/12 उतारा, (2) 8/अ, (3)जातीचा दाखला,
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :वैयक्तिक / सार्वजनिक
  अर्ज करण्याची पद्धत :

   पाणलोट आधारीत उपचार असल्याने क्षेत्रिय कर्मचा-या मार्फत सर्वेक्षण करुन घ्यावयाचे उपचार व लाभार्थी निवड केली जाते.

   १०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
   ११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय
   १२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

   गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम

   अ.क्र.योजनासविस्तर माहिती
   योजनेचे नाव :गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम
   योजने बद्दलचा शासन निर्णय :ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रं. आदर्श 2007/प्र.क्र.121/जल-7, दि.30/11/2007
   योजनेचा प्रकार :राज्य योजना
   योजनेचा उद्देश :अपुर्ण पाणलोट गतिमान पध्दतीने पूर्ण करणे.
   योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :सर्व प्रवर्ग
   योजनेच्या प्रमुख अटी :
   • 1. 500 ते 1000 हे. क्षेत्र मर्यादेचा पाणलोट असावा.
   • 2. 75 टक्कयांपेक्षा जास्त काम पुर्ण झालेल्या पाणलोटास प्रथम प्राधान्य
   • 3. सुकाणू समितीची मान्यता असणे आवश्यक
   आवश्यक कागदपत्रे :(1) 7/12 उतारा, (2) 8/अ, (3) लाभार्थांचे संमतीपत्र
   दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :वैयक्तिक / सार्वजनिक
   अर्ज करण्याची पद्धत :

    पाणलोट आधारीत उपचार असल्याने क्षेत्रिय कर्मचा-या मार्फत सर्वेक्षण करुन घ्यावयाचे उपचार व लाभार्थी निवड केली जाते.

    १०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
    ११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय
    १२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
    अ.क्र.योजनासविस्तर माहिती
    योजनेचे नाव :मागेल त्याला शेततळे
    योजने बद्दलचा शासन निर्णय :शेततळे – 2016/प्र.क्र. 1 (74)/रोहयो-5 दिनांक 17 फेब्रुवारी 2016
    योजनेचा प्रकार :वैयक्तिक लाभाची योजना
    योजनेचा उद्देश :संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करणेसाठी शेतक­यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवून शेतक­यांचे जीवनमान उंचावण्यास मदत.
    योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :सर्वच प्रवर्गातील शेतक­यांसाठी. (मागील 5 वर्षात ण्क वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसे वारी जाहीर झ्रालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.) कोकण विभाग वगळुन.
    योजनेच्या प्रमुख अटी :
    • 1) शेतक­यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
    • 2) लाभार्थी शेतक­याची जमीन शेतळयाकरिता तांत्रिक दृष्टया पात्र असणे आवश्यक राहिल. जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळयामध्ये भरणे अथवा पुर्नभरण करणे शक्य होईल.
    • 3) यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
    आवश्यक कागदपत्रे :
    • 1) जमिनीची 7/12
    • 2) 8 अ चा उतारा
    • 3) दारिद्र रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला
    दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :अनुदान (कमाल मर्यादा रुपये 50000/-)
    अर्ज करण्याची पद्धत :

     ऑनलाईन (संगणकीय प्रणालीव्दारे)

     १०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :3 महिने
     ११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :तालुका कृषि अधिकारी कार्यालय
     १२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:www.aaplesarkar.maharashtra.gov.in

     Check Also

     इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

     सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

     संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

     संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

     प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

     प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

     पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

     माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

     Leave a Reply