मेळघाट अभयारण्य

मेळघाट अभयारण्य

व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये ‘सिपना’ (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे.  हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.
मेळघाट

चिखलदरा.ऑर्ग –

मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.
मेळघाटातील दिवाळी

मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.

विदर्भातील गोंदिया जिल्हयात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. अंदाजे इ. स. १३०० मध्ये या भागावर गोंड राजांचे राज्य होते. या गोंड आदिवासींचा राजा होता दलपतशाह आणि राणी होती दुर्गावती. या द्रष्ट्या राजदांपत्याने आपल्या प्रजेच्या उदरनिर्वाहासाठी उपयुक्त अशा शेतीचे महत्त्व जाणले होते. परंतु शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी लहरी पावसावर अवलंबून राहता येणार नाही हे त्यांनी ओळखले व त्यांनी या भागात विविध ठिकाणी जलाशय व तलाव बांधले. त्यामुळेच भारतातील हा गोंदिया जिल्हा आज ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. इथल्या या तलावांवर अनेक स्थानिक पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित पक्षीही येतात. या सर्वांत डौलदार अशा सारस पक्ष्याचीही वर्णी लागते. या पाणवठ्यांमुळेच इथले प्राणीजीवनही समृध्द आहे.

आज नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र अभयारण्याचा एक भाग असलेल्या या नवेगाव तलावाने पूर्वी गोंड आदिवासी राज्य त्यानंतर ब्रिटिश राज्य आणि भारताचे स्वतंत्र राज्यही अनुभवले आहे. खूप पूर्वीपासूनच या तलावावर पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात. जवळच असलेल्या दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळीच्या जंगलात वाघ, चित्ते, सुस्त अस्वले आणि जंगली बैल असे अनेक वन्यजीव राहतात. या सर्वांसाठी हा तलाव हे एक वरदान ठरले आहे.

इथे तलावाच्या बाजूला असलेल्या ‘संजय कुटीर’ मध्ये राहणे हा एक आगळा वेगळा अनुभव ठरतो. इथल्या खोल्या या झाडांवर असल्यामुळे आपण या घनदाट अरण्याचाच एक भाग होऊन जातो. शहरी गजबजाटापासून दूर अशा निसर्गरम्य वातावरणात मिसळून जातो. इथून अंदाजे २ कि.मी. अंतरावर यूथ होस्टेल आहे. तलावाच्या किनाऱ्याने असंख्य पक्षी आणि पाण्यावर आलेले तहानलेले प्राणी बघत रमतगमत तिथे जाता येते. रात्रीच्यावेळी तर शेकडोंच्या संख्येने लकाकणारे उत्सुक डोळे आपल्याला बघत असतात. हरणांचे हे डोळे निरखणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे.

या राष्ट्रीय उद्यानात ‘जंगल सफारी’ ला जाता येते. या जंगलातील प्राणिजगत पाहून कोणीही निसर्गवेडा नि:शब्द होतो. फक्त वाघ किंवा चित्ताच बघण्याच्या आशेने जंगलात जाऊ नका. वाघ दृष्टीस पडला नाही तरी तुमची निराशा होणार नाही कारण हे जंगल इतर अनेक प्राण्यांनी समृध्द आहे. वाघ, चित्ता यासारख्या भक्षक प्राण्याच्या येण्याची खबर इतर छोट्या प्राण्यांकडून मिळते. प्रत्येक प्राण्याचा स्वत:चा असा एक भाग असतो. हा प्राणी इथे आला आहे ही बातमी द्यायला हरणे, सांबर, लंगूर आणि मोरसुद्धा एक विशिष्ट आवाज काढतात. आपण जर नशीबवान असू तर इथे आपल्याला अशा एखाद्या रुबाबदार वाघाचे अथवा चित्त्याचे दर्शन घडते.

छायाचित्रणप्रेमींसाठीसुद्धा नवेगावाचा हा भाग एक आकर्षण ठरतो. महाराष्ट्रात सापडणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या निम्मे पक्षी नवेगावात हजेरी लावतात. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती इथे पाहायला मिळतात. त्यामुळेच तुमच्या ‘कॅमेऱ्यासाठी’ इथे मुबलक खाद्य उपलब्ध आहे.

पर्यटकांसाठी विशेष सूचना

नवेगाव दर्शनाचा आनंद तुम्ही कदाचित घेतलाच असेल. परत जाल तेव्हा विदर्भातील प्रसिद्ध संत्री, आंबे, संत्र्याची बर्फी या बरोबरच खोया जिलबीचा आस्वादही जरूर घ्या. इथे हल्दीरामच्या दुकानात मिळणारे, पाहताक्षणी खावेसे वाटणारे अनेक जिन्नस जरूर खाऊन बघा.

भेट देण्याच्या वेळ

ऑक्टोबर १ – जानेवारी ३१ – सकाळी ७ ते संध्याकाळी ६.
फेब्रुवारी १ – जून १५ — सकाळी ७ ते संध्याकाळी ७.
जून १६ – सप्टेंबर ३०.

राहण्याची सोय

M T D C, नवेगाव बांध आणि वनविकास विभागाच्या जागा

हवामान

उन्हाळ्यात कधी कधी तापमान ४००C च्या वर जाते. तर हिवाळ्यात इथे खूप थंडी असते. त्यावेळी गरम कपडे बरोबर न्यावेत.
ऑक्टोबर ते मे या काळात तिथे जाणे उत्तम ठरते. पक्षिनिरीक्षणासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ योग्य आहे.

कसे जाल ?

जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. (१५० कि.मी.)
जवळचे रेल्वे स्थानक गोंदिया येथे आहे. (६५ कि.मी.)
जवळचे बस स्थानक नवेगाव येथे आहे. (उद्यानापासून १० कि.मी.)

जवळची ठिकाणे

नागझिरा अभयारण्य (६० कि.मी), इटियाडोह धरण (२० कि.मी.), तिबेटन कॅम्प आणि प्रतापगड (१५ कि.मी.)

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला..शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात. श्री

गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्य म्हणजे, येथे असलेली स्वच्चता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून, दुपारच्या वेळी सर्व भकतांना भोजन प्रसाद वाटप केले जाते.

भोजनस्थळ देखिल अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात. खरोखरच, जागजागी श्री महाराजांचे प्रेम जाणवते आणि ते देहात असताना त्यांचे आपल्याला दर्शन झाले नाही, ह्याची पुन्हा पुन्हा खंत वाटत राहते. स्वार्थाने बरबटलेल्या या कलियुगात, अशा थोर संतांची कीर्ति वाढत जाण्याचे कारण काय, तर त्यांचे भक्तांवरील निर्व्याज, निष्काम, निरपेक्ष प्रेम (अकारण कारुण्य). भक्तांचा उद्धार व्हावा हीच, त्यांचे आचारविचार बदलावेत, त्यांना शाश्वत आणि अशाश्वत ह्यांमधिल फरक कळावा, त्यांच्या हातून साधना व्हावी आणि त्यांचे जन्म-मृत्युचे फेरे चुकावेत ह्या उदात्त हेतुने ते भक्तांना जवळ करतात. ते स्वत: निरपेक्षच असतात. अशा ह्या थोर सद्गुरु महाराजांचे वर्णन मी पामर काय करणार? खरी भक्ति करणाऱ्या भक्तांना त्यांचे अनुभव येतच असतात.

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply