Amazon Big Sell

रांगणा किल्ला

बांधणाऱ्याचे नाव :
प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह
बांधणाऱ्याचे नाव :
शिलाहार राजा भोज
वर्ष :
११७८
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.

पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.

मार्च २, १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.

१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
वर्ष :
११ व्या शतकात
रांगणा किल्ला ११ व्या शतकात शिलाहार राजा भोज यांनी बांधला. सोळाव्या शतकात या किल्ल्याचा ताबा आदिलशाहीकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये हा किल्ला जिंकला. त्यांनी रांगणा किल्ल्यावर तीनवेळा मुक्काम केल्याचा उल्लेख आढळतो.

छत्रपती शिवरायांनी १६७१ मध्ये रांगण्याच्या दुरुस्तीसाठी १०,००० होन बाजूला काढले होते. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांची कारकीर्दही या किल्ल्याशी निगडित आहे. घनदाट जंगल, वन्यप्राण्यांचा वावर, रस्त्यांचा अभाव अशा खडतर स्थितीतून मार्ग काढत निसर्गवेध संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक रांगणा किल्ल्याच्या पूर्वेला आठशे फूट खोल दरीत पडलेली शिवकालीन तोफ शोधून काढली. मोठमोठाले दगडगोटे आणि झाडेझुडपे साफ करत तोफेची साफसफाई केली. तोफेचे वजन १८०० किलोंच्या आसपास आहे.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply