Amazon Big Sell

राज्यातील मच्छिमारांना अपघात गट विमा योजना लागू करण्याबाबत.

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राज्यातील मच्छिमारांना अपघात गट विमा योजना लागू करण्याबाबत.
योजने बद्दलचा शासन निर्णय : कृषि व पदुम विभाग क्रमांक – मत्स्यवि- 1007/प्र.क्र. 89/पदुम-14, दिनांक 11 डिसेंबर 2009
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : मच्छीमारांना विम्याचे छत्र उपलब्ध करून देणेबाबत
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : लागू नाही
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) महाराष्ट्र राज्याच्या 18 ते 65 वयोगटातील जनगणना नोंदीनुसार नोंद असलेला मच्छिमार असावा.
  • 2) तो क्रियाशील असावा.
  • 3) मच्छिमार मुत्य, पावल्यास सक्षम यंत्रणेचा दाखला
  • 4) वयाच्या पडताळणी करीता सक्षम यंत्रणेचा दाखला
आवश्यक कागदपत्रे :
अ.क्र. अपघाताचे स्वरुप आवश्यक कागदपत्रे
1 मासेमारी करताना वा त्या अनुषंगाने कामे करताना झालेला अपघात पोलीस ठाण्यात नोंद, स्थळ पंचनामा, क्रियाशील मच्छिमार असल्याचा दाखला, ग्रामपंचायत/ नगरपरिषद वारस दाखला, मृत्यू दाखला, मृत्यू मासेमारी करीत असताना झाला याचा चौकशी अहवाल
2 रस्त्यावरील अपघात पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखल
3 वीजेच्या धक्क्यामुळे अपघात पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखल
4 वीज पडून मुत्यू पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखल
5 खून पोलीस ठाण्यात नोंद, चौकशी अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखल
6 उंचावरुन पडून झालेला मृत्यू पोलीस अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, पोलीस अंतिम अहवाल, मृत्यु दाखला, वारस दाखला
7 सर्पदंश/ विंचूदंश पोलीस पाटील अहवाल,मृत्यु विश्लेषण अहवाल, डॉक्टरांच्या मतानुसार आवश्यक असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल वैद्यकीय उपचारापूर्वी निधन झाल्यास मृत्यु विश्लेषण अहवाल नसल्यास चौकशी अहवाल, स्थळ पंचनामा, मृत्यु दाखला, वारस दाखला
8 नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्येसंदर्भात प्रथम माहिती अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल, नक्षलाईट हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे, मृत्यु दाखला, वारस दाखला
9 जनावरांच्या चावल्यामुळे रेबीज/ जखमी होऊन अपंगत्व औषधोपचाराची कागदपत्रे, स्थळपंचनामा, चौकशी अहवाल,डॉक्टरांच्या मतानुसार आवश्यक असल्यास मृत्यु विश्लेषण अहवाल, मृत्यु दाखला, स्थळ पंचनामा, चौकशी अहवाल, पोलीस पाटील अहवाल, प्रतिपूर्ती बंधपत्र, वारस दाखला.
10 दंगल प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल, मृत्यु विश्लेषण अहवाल,दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे,मृत्यु दाखला,वारस दाखला
11 अन्य कोणते अपघात प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल, मृत्यु दाखला, वारस दाखला
12 अपंगत्व लाभासाठी
  • 1.अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी प्रमाणपत्र.
  • 2.प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या प्रतिस्वाक्षरीसह प्रमाणपत्र.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाकडे जनगणनेच्या नोंदीनुसार भूजल, सागरी, निमखारेपाणी इत्यादी क्षेत्रामध्ये 18 ते 65 वयोगटातील क्रियाशील मच्छिमारांना अपघात व अपंगत्व यासाठी सदर अपघात गट विमा योजना लागू करण्यात आली आहे. मच्छिमारांचा मासेमारी करीत असताना मृत्यू/पूर्णत: कायमचे अपंगत्व आल्यास रुपये 200000/- विमा संरक्षण व अंशत: अपंगत्व आल्यास रुपये 100000/- चे विमा संरक्षण देण्यात येईल. मच्छिमारांनी विमा हप्त्यापोटी रक्कम भरण्याची आवश्यकता असणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत : सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचेकडे अर्ज करावा
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : तीन महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय
Asha Transcription

About admin

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published.