अ. क्र. | Scheme | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नाव : | राज्य वस्त्रोद्योग धोरण 2011-17 अंतर्गत स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान देण्याबाबत |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | शासन निर्णय क्र. धोरण २०१5/प्र.क्र. 151 /टेक्स-5, दि. 2 डिसें.2015 |
३ | योजनेचा प्रकार : | ऐच्छिक |
४ | योजनेचा उद्देश : | वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना जे व्याज व भांडवली अनुदान दिले जाते ते वस्त्रोद्योग घटकांना वित्तीय संस्थांनी मंजूर केलेल्या दिर्घ मुदती कर्जाशी निगडीत (Credit linked) आहे. म्हणजेच वस्त्रोद्योग प्रकल्पांना वित्तीय संस्थांनी दीर्घ मुदती कर्ज मंजूर केले असेल तरच ते सध्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरू शकतात. जे वस्त्रोद्योग घटक स्व-निधीतून (Self-financed) प्रकल्प उभारतात असे वस्त्रोद्योग घटक अर्थसहाय्यासाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे जे वस्त्रोद्योग प्रकल्प स्व-निधीतून उभारले जातील अशाही वस्त्रोद्योग प्रकल्पांना राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सवलती देण्याकरीता. |
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | दि.2 डीसेबर,2014 ते दि. 31 मार्च, 2017 या कालावधीत TUFS च्या निकषानुसार स्व-निधीतून (Self-financed) प्रकल्प उभारण्यात आलेले वस्रोद्योग प्रकल्प. |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : |
|
७ | आवश्यक कागदपत्रे : | सदर योजना हि बॅंक/वित्तिय संस्था यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत टफ योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येते. योजने बाबतच्या कागदपत्रांची पुर्तता SICOM अथवा राष्ट्रीयकृत बॅंकांकडून करण्यात येते. |
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | राज्य वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पांना त्यांच्या पात्र प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के भांडवली अनुदान देय राहील. विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापुस उत्पादक क्षेत्रातील स्व – अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना अतिरीक्त १० टक्के भांडवली अनुदान अनुज्ञेय राहिल. |
९ | अर्ज करण्याची पद्धत : | SICOM अथवा राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत ऑनलाईन |
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | एक महिना |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : |
|
१२ | Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: | www.mahatextile.maharashtra.gov.in |
Check Also
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …