राज्य शासनाची इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राज्य शासनाची इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्यांक विकास विभाग,अविवि-2011/प्र.क्र.44/11/का.6 दि.14-ऑक्टेाबंर 2011.
योजनेचा प्रकार :
 • राज्य शासनाने अल्पसंख्यांक लोकसमुह म्हणुन घेाषीत केलेल्या राज्यातील मुस्लीम,बौध्द,ख्रिश्चन,जैन,शीख व पारशी या सामाजातील तंात्रिक व व्यवसायीक तसेच इयत्ता बारावी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
 • सदर योजनेचे नोडल ऑफीसर संचालक तंत्रशिक्षण हे आहेत. या संचालनालयाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अर्जानूसार विद्यार्थ्यांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येते. सदर शिष्यवृत्तीची रक्कम तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.
योजनेचा उद्देश : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन)
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांमध्ये (कला ,वाणिज्य, विज्ञान) प्रथम वर्ष ते अंतिमवर्षात शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लागू आहे.
 • 2. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व त्याने उच्च माध्यमीक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
 • 3. अर्जदार हा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.
 • 4. पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 6.00 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 • 5. नुतनिकरणासाठी विद्यार्थ्यांने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
 • विद्यार्थ्याचा फोटो
 • माध्यमिक व उच्च माघ्यमीक शालंात प्रमाणपत्र परीक्षा व त्यापुढील परीक्षांमधील गुणपत्रीकेच्या प्रती.
 • पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
 • बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
 • महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रु.5000/- पर्यंत (अभ्यासक्रम निहाय) सदर रक्कम ही तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.श्
अर्ज करण्याची पद्धत : नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑॅफलाईन पदधतीने अर्ज मागवीण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अर्ज संबंधित महाविद्यालयाकडे दिल्यानंतर महाविद्यालयांनी अर्ज तपासून प्रमाणीत करुन सदर अर्ज विभागीय सहसंचालक कार्यालयांकडे जमा करण्यात येतात. सहसंचालक कार्यालयाकडून अर्जांची पडताळनी करुन विहित नमुन्यातील यादी या संचालनालयाकडे प्राप्त होते. सदर यादी मंजूरीसाठी या योजनेचे नोडल अधिकारी संचालक तंत्रशिक्षण यांचेकडे पाठविण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : (कालावधी : 7 ते 8 महिने).
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply