राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : क्रीडा व सेवायोजन विभाग, शा.नि. क्र. एससीएच-1065-यु, दिनांक 19 सप्टेंबर, 1965.
योजनेचा प्रकार : शासकीय विज्ञान संस्था / महाविद्यालय तसेच विद्यापीठांकडून प्राप्त झालेल्या आवेदन पत्रानुसार विहित केलेल्या मंजूर संचाच्या (एकूण मंजूर संच – 76) प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
योजनेचा उद्देश : राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1. पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतेलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यास्तव पात्र आहेत.
  • 2. विद्यार्थ्यांचा अर्ज संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांना संबंधित महाविद्यालयामार्फत 30 सप्टेंबर पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
  • 3. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील समाधानकारक प्रगती अहवालानुसार दुसऱ्या वर्षाचे नुतनीकरण मंजूर केले जाते.
आवश्यक कागदपत्रे :
  • 1. पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
  • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
  • 3. महाविद्यालयात प्रवेश घेतलेबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नवीन मंजूरीस्तव अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस शा.नि.05.02.2004 प्रमाणे प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1000/- तथापि, नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रति माह 100 प्रमाणे रक्कम रु. 1200/-
अर्ज करण्याची पद्धत : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत त्यांचे अधिनस्त संबंधित महाविद्यालयास/अकृषि विद्यापीठांस माहे जुलै मध्ये परिपत्रकाद्वारे सदर योजनेचा माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया/अर्जाचा नमुना पाठविण्यात येतो. विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज ऑफलाईन पध्दतीने आवश्यक सहपत्रांसह महाविद्यालयामार्फत / विद्यापीठांमार्फत उच्च शिक्षण संचालनालयास 30 सप्टेंबर पुर्वी सादर करणे आवश्यक आहे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे फेब्रुवारी – मार्च मध्ये विभागीय संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचेद्वारे महाविद्यालयास/विद्यार्थ्यांस वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply