Home / Maharashtra Forts / रायकोट किल्ला

रायकोट किल्ला

सुरत – बुर्‍हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला बांधण्यात आला. तीन बाजूंनी तासलेले कडे व रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला नैसर्गिकरित्याच बळकट व अभेद्य आहे.

रायकोट हा छोटेखानी किल्ला मुख्यत: व्यापारी मार्गावर टेहाळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. अहिर राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही.

रायकोट गावातून किल्ल्यावर जाताना दोन डोंगरामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक खंदकांच्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते, त्यामुळे अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या पठारावर एक बुरुज व तलाव पहायला मिळतो. किल्ल्याच्या तीन बाजूंना खोल दर्‍या व तासलेले उभे कडे आहेत. या दरीला माकडदरी म्हणतात.

मोरकरंज गावातून किल्ल्यावर जाणार्‍या वाटेवर दगडात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत. पायर्‍यांजवळच १० फूट * २० फूट आकाराची गुहा आहे, पण ती रहाण्यास योग्य नाही. गडावरुन माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते.

Check Also

किल्ले रोहिडेश्वर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ …

राजमाची किल्ला

राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच ‘कोंडाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून …

राजगड

किल्ले राजगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख …

तोरणा

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची …

Leave a Reply