राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एनएलएम-2014/ प्र.क्र.170/ (भाग-2)/ पदुम-4, मंत्रालय विस्तार, मुंबई-32 दि.11 सप्टेंबर, 2014
योजनेचा प्रकार : वैयक्तिक लाभाची योजना
योजनेचा उद्देश :
 • देशी / संकरीत / पाळीव पशु (घोडे, गाढव,खेचरे, उंट, म्युल तसेच वळू, बैल व रेडे) आणि पाळीव पशु (शेळया, मेंढया, डुकरे, ससे, याक व मिथुन) यांचा या योजने अंतर्गत समावेश करणेत आला आहे. या योजने अंतर्गत लाभ देणेकरिता जास्तित जास्त्
 • प्रति लाभार्थी प्रति कुटूंब 5 जनावरांचा समावेश आहे. (यामध्ये गाय / म्हैस, वळू, बैल व रेडे याकरिता 1 जनांवरास 1 व शेळया, मेंढया, डुकरे, ससे वगळून) शेळया, मेंढया, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झालेस अनुदान देय ठरविणेसाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करणेत येतो. याकरिता एक पशुधन घटक म्हणजे 10 शेळया, मेंढया, डुकरे, ससे इ. असे समजण्यात येते. अशा प्रकारे 5 पशुधन घटकाप्रमाणे शेळया, मेंढया,डुकरे,ससे यांचा लाभ देण्यात येतो. 5 पेक्षा कमी शेळया, मेंढया, डुकरे, ससे असलेल्या लाभार्थींना 1 पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देणेत येतो.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वसाधारण, दारिद्र्ययरेषेवरील, दारिद्र्ययरेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती चे लाभार्थी
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1 या योजनेमधे एकाच कुटूंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
 • 2 या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थीस 5 पशुधन घटकाप्रमाणे अनुदानांवर विमा उतरविणेची सुविधा आहे. इतर जनावरांचा विमा अनूदाना शिवाय पूर्ण रक्क्मेचा भरणा करून उतरविता येतो.
 • 3 योजनेच्या पाठपुराव्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळेस माहिती उपलब्ध करून देण आवश्यक आहे.
 • 4 योजनेअंतर्गत -विमा उतरविणेत आलेले जनांवराची / जनावरांची विक्री केलेस विमा कंपनीस आवश्यकते शुल्क् भरणाकरून नविन खरेदीदाराकडे विमा हस्तांतरित करता येतो.
 • 5 विमा उतरविणेत येणाऱ्या जनावरांची ओळख जनावरांचे कानात टॅग मारून निश्चितकरण्यात येते.
 • 6 जनावरांची / पशुंची किंमत ही लाभार्थी व विमा कंपनी यांनी पशुवैद्यकाच्या सल्यानूसार निश्चित करावी. दुभत्या जनावरांची किंमत ही किमान रु.3000/- प्रति लिटर प्रति गायींकरिता व रु.4000/- प्रति लिटर प्रति म्हैशीकरिता प्रति दिन दुध उत्पादनांवर आधारीत किंवा शासनाने ठरविलेप्रमाणे कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या स्थानिक बाजारातील आधारभूत किंमतीनूसार निश्चित करण्यात यावी. घोडे , गाढव, म्युल्स्‍, उंट, खेचर आणि वळू, बैल, रेडयांची किंमत बाजार भावावर आधारीत तसेच इतर पशुधनाकरिता (शेळया, मेंढया,डुकरे,ससे,याक व मिथुन) बाजारभाव, पशुपालक आणि विमा कंपनी यांनी एकत्रीतपणे पशुवैद्यका समक्ष् निश्चित करावी.
 • 7 विमा क्लेम निकाली काढणेकरिता केवळ चार कागदपत्रांची पूतर्ता करणे आवश्य्क राहील जसे की जनावरांचा विमा उतरविलेची मुळ पॉलीसी, जनांवर मृत झालेबाबत विमा कंपनीस दिलेली सुचना, क्लेम फॉर्म व शवविच्छेदन प्रमाणपत्र. तसेच मृत जनांवराचा कानातील टॅगसह व विमा लाभार्थी यांचा एकत्रित फोटोग्राफ (छायाचित्र्)
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
 • 2. जातीचा दाखला प्रवर्गनिहाय
 • 3.दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला.
 • 4. रहिवासी प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • या योजने अंतर्गत लाभ देणेकरिता जास्तित जास्त् प्रति लाभार्थी प्रति कुटूंब 5 जनावरांचा समावेश आहे. (यामध्ये गाय / म्हैस, वळू, बैल व रेडे याकरिता 1 जनांवरास 1 व शेळया, मेंढया, डुकरे, ससे वगळून ) शेळया, मेंढया, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झालेस अनुदान देय ठरविणेसाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करणेत येतो. याकरिता एक पशुधन घटक म्हणजे 10 शेळया, मेंढया, डुकरे, ससे इ. असे समजण्यात येते. अशा प्रकारे 5 पशुधन घटकाप्रमाणे शेळया, मेंढया,डुकरे,ससे यांचा लाभ देण्यात येतो. 5 पेक्षा कमी शेळया, मेंढया, डुकरे, ससे असलेल्या लाभार्थींना 1 पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देणेत येतो. यामध्ये प्रवर्ग निहाय खालीलप्रमाणे अनुदानांवर 1 व 3 वर्ष कालावधीकरिता जनावरांचा विमा उतरविणेची सुविधा उपलब्ध आहे.
 • हिस्सा नक्षलग्रस्त् जिल्हे वगळून (दारिद्रयरेषेवरील) नक्षलग्रस्त् जिल्हे वगळून (दारिद्रयरेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती चे लाभार्थी) नक्षलग्रस्त् जिल्हे (गडचिरोली,गोंदिया व चंद्रपूर) (दारिद्रयरेषेवरील) नक्षलग्रस्त् जिल्हे (गडचिरोली,गोंदिया व चंद्रपूर) (दारिद्रयरेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती चे लाभार्थी)
  केंद्र 25% 40% 35% 50%
  राज्य 25% 30% 25% 30%
  लाभार्थी 50% 30% 40% 20%
अर्ज करण्याची पद्धत : नजिकचा पशुवैद्यकिय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांचे मार्फत नियुक्त केलेल्या विमा कंपनीचे शाखा कार्यालय
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज केलेनंतर लाभार्थीने लाभार्थी हिस्सा भरणा केलेनंतर व उपलब्ध् तरतुदीचे अधिन राहून.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • 1.पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
 • 2.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.
 • 3.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सुविधा उपलब्ध नाहीत

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply