Amazon Big Sell

वन्यप्राण्यांपासून मनुष्य हानी, पशुधन हानी, शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितांस नुकसार भरपाई देण्याबाबत.

योजनेचे नाव : वन्यप्राण्यांपासून मनुष्य हानी, पशुधन हानी, शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितांस नुकसार भरपाई देण्याबाबत.
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • क्र.डब्ल्युएलपी-0212/प्र.क्र.326/फ-1, दि. 09 जुलै, 2015
  • क्र.डब्ल्युएलपी-0212/प्र.क्र.337/फ-1, दि. 16 जाने, 2015
  • क्र.डब्ल्युएलपी-0212/प्र.क्र.326/फ-1, दि. 23 डिसें, 2015
  • क्र.डब्ल्युएलपी-1008/प्र.क्र.270/फ-1, दि. 02 जुलै, 2010
योजनेचा प्रकार : राज्य योजना
योजनेचा उद्देश : राज्यातील रानडुक्कर, हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, रोही (निलगाय), माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्ग
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1.पीक नुकसानीची तक्रार नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वनपरिक्षेत्राधिकारी यांचेकडे घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.
  • 2. पीक नुकसानीबाबतची शहानिशा संबंधित वनपाल, संरपंच, व ग्रामसेवक / तलाठी या तीन सदस्यांच्या समितीमाफर्त 10 दिवसांच्या आत करावी.
आवश्यक कागदपत्रे : पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : शासन निर्णयानुसार वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : नुकसानीची अर्ज नजीकचे वनरक्षक, वनपाल अगर वनपरिक्षेत्राधिकारी यांचेकडे घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अंदाजे 1 महिना कालावधी
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक / उप विभागीय अधिकारी/ वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: mahaforest.nic.in
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply