Amazon Big Sell

वर्धा जिल्हा

वर्धा जिल्हा

 

महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो

सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते.

इतिहास

बेरार

वर्धा जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण वर्धा नदीचा उल्लेख ई.पु. २ शताब्दी मध्ये आढळतो. विदर्भाचा राजा बेरार च्या संबंधाने वर्धा नदीचा उल्लेख आढळतो. विदर्भ (बेरार) प्रदेश हा वर्धा नदीने विभागल्या जाऊन बेरार आणि त्याचा भाऊ माधवनसेना यांच्यात वाटला गेला.

चालुक्य आणि राधात्रकुट राजा

वर्धा आणि उर्वरित बेरार प्रांतात चालुक्य राजपूत घराण्याने ई.स. ५५० ते ७५० मध्ये राज्य केले. त्याची राजधानी आधुनिक बिजापूर येथे होती व नंतर ती नाशिक ला हलविण्यात आली.
या राजघराण्याशी सबंधित ताम्र पत्रे बैतुल जिल्ह्याच्या मुलताई आणि वर्धा जिल्ह्याच्या देवळी येथे सापडली. देवळी येथे सापडलेली पत्रे ई. ९४० ची असून त्यात नागापूर-नंदिवार्धाम जिल्ह्यातील तलपुरुम्शक हे गाव काणारेसे ब्राह्मणाला दान केल्याचा उल्लेख आहे.

बहमनी साम्राज्य

वर्धा तदनंतर सोलापु आणि बिदर जवळील गुल बर्ग च्या राजाच्या प्रांतात सामील करण्यात आला. या राजाने मुहम्मद तुघलक शी बंडखोरी केलेली होती आणि तो एक ब्राम्हण किवा ब्राम्हण सेवक होता. सर ए. लिअल म्हणतात “बेरार चे बहमनी साम्राज्य सातपुडा ते दक्षिणेकडे गोदावरी पर्यंत आणि खानदेश व दौलताबाद ते पूर्वेकडे गोदावरी पर्यंत पसरलेले होते.

इमाद शाही राजवंश

इ.स. 1437 मध्ये गुजरातच्या राजानी बेरार वर आक्रमण केल्याचा प्रारंभिक उल्लेख आहे ज्यात गोंडवाना च्या राजाने (वर्धा ओलांडून) मदद केली व तो चांदा येथील होता. इ.स. 1518 मध्ये बहमनी साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ बेरार वर इमाद शाही राजपुत्राने इल्लीचपुर येथून राज्य केले

मुघल साम्राज्य

नव्वद वर्षांच्या स्वतंत्र अस्तित्व नंतर 1572 मध्ये अहमदनगर राजानी इल्लीचपुर साम्राज्य नष्ट केले आणि १५९४ मध्ये बेरार अहमदनगर पासून सम्राट अकबर च्या साम्राज्याला जोडण्यात आले

मराठा स्वारी

1822 मध्ये भोसल्याद्वारे वर्धा नागपूर मध्ये समाविष्ट करण्यात आला त्याचबरोबर गवळीगड आणि नरनाळा हे किल्ले व काही भूभाग निझामच्या ताब्यात देण्यात आला.

जिल्हा निर्मिती

ब्रिटीश्‍शांच्या काळात 1862 पर्यंत वर्धा हा नागपूरचाच एक भाग होता.प्रशासकिय कारणाने वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले पण नंतर 1866 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आले. जिल्हयाला वर्धा हे नाव वर्धा नदीवरुन देण्यात आले.

जिल्हा एक दृष्टीक्षेप

 • क्षेत्र : ६३१० चौरस किमी
 • लोकसंख्या : १३००७७४
 • भाषा : मराठी, हिंदी, इंग्लिश
 • गावे : १३८७
 • पुरुष : ६६८३८५
 • स्त्रिया : ६३२३८९
 • साक्षरता : ७२.८० टक्के
 • स्थान : २०°४४′३०″ अक्षांश 78°36′20″ रेखांश

चतुःसीमा

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके

 • आर्वी
 • आष्टी
 • सेलू
 • समुद्रपुर
 • कारंजा (घाडगे)
 • देवळी
 • वर्धा
 • हिंगणघाट
Asha Transcription

About admin

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published.