वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र

कु. सायली भगत,
साई-दर्शन इमारत, म्हसरळ,
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . २८ जानेवारी २०१८

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,
अभिनव विद्यालय,
पंचवटी, नाशिक – ४२२००४.

विषय – वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र

मी कु. सायली भगत आपल्या शाळेची ९ वी (ब) ची विद्यार्थीनी आहे. मला वाचनालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांची पुस्तके आणि काही इतर उपयोगी पुस्तके हवी आहेत. मला पुढच्या महिन्यात होणाऱ्या ‘राष्ट्रीय विज्ञान स्पर्धत’ सहभाग घ्यायचा आहे. पण वाचनालय प्रमुखांच्या म्हणन्यानुसार पुस्तके घरी नेण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की मला ही पुस्तके घरी नेण्याची अनुमती मिळावी. मी स्पर्धत चांगले काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

धन्यवाद.

तुमची आज्ञाधारक
कु. सायली भगत
वर्ग ९ (ब)

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply