वारुगड

विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले.

आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.

गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत. या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षीत केलेला आहे.

या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या तटबंदीपासून खालच्या माचीपर्यंत एक भिंत बांधून काढलेले आहे. या भिंतीमुळे दोन भाग झालेले आहेत.

भिंतीच्या पलिकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे टाके नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहे. याच्या पलिकडे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहे.

बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमिनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रूळलेली आहे.तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे.

दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत. अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे आहे. माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी, खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे. एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी ‘जाते’ ही पडलेले आहे. तटबंदीमध्ये एक शौचकुपही आहे. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो.

स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते. महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो. खालच्या माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जिर्णोद्धार केलेले मंदिर आहे. अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे. हे भैरवनाथाचे मंदिर असून भाविक परिसरामधून येत असतात

admin

Leave a Reply

Next Post

भूपाळगड

Fri May 3 , 2019
भूपाळगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या बाणूर गावामुळे या किल्ल्याला “बाणूरचा किल्ला” म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे. पूर्व आणि उत्तरेकडे साधारण ७०० फूट उंच कडे आहेत. पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही. बाणूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे. सध्या किल्ल्यातच गाव वसलेल […]
WhatsApp chat
%d bloggers like this: