वाशीम जिल्हा

वाशीम जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत.

जिल्ह्यातील तालुके

  1. कारंजा
  2. मंगरुळपीर
  3. मानोरा
  4. मालेगाव
  5. रिसोड
  6. वाशीम

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे – श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड),श्री पिंगळाशी देवी(रिसोड),श्री सितला मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड),बालाजी मंदिर (वाशीम), श्रीक्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, नृसिंह सरस्वती मंदिर (करंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी

 {तालुक्यातील धार्मीक स्थळे}

कारंजा: गुरुमंदिर,जैन मंदिर,राम मंदिर रिसोड: श्री सितला मंदिर

वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस शेलगाव राजगुरे या गावापासून १ किलोमीटरवर मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीरमानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवापूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

भूगोल

वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस शेलगाव राजगुरे या गावापासून १ किलोमीटरवर मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.

 

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply