Amazon Big Sell

वैराटगड

शिलाहार वंशीय दुसरा भोजराजा
बांधणाऱ्याचे नाव :
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगररांग धावत गेलेली पाहण्‍यास मिळते. ती फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने पुढे जाते. त्या पूर्व-पश्चिम दिशेने धावणाऱ्या डोंगररांगेत वारुगड किल्ला ठाण मांडून बसला आहे.

वारुगडची समुद्रसपाटीपासूनची उंची ९०६ मीटर आहे. किल्ला ट्रेकींगच्‍या दृष्टीने सोपा आहे. किल्ला माणगंगा नदी जेथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीला आहे. वारुगड किल्ला दहिवडी गावाच्या पश्चिमेस वीस मैलांवर स्थित आहे.

वारुगड किल्ला शिवरायांनी बांधला अशी माहिती प्रचलित आहे. विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद घालण्‍यासाठी, तसेच स्वराज्याची साताऱ्याकडील बाजू मजबूत करावी यादृष्टीने शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि वारुगड हे दोन किल्ले निर्माण केले. वारुगडचा किल्लेदार परभू जातीचा होता. त्या किल्ल्यावर दोनशे पहारेकरी व बरीच शिबंदी होती. तो किल्‍ला साताऱ्याच्या राजाच्या विठ्ठलपंत फडणवीस याने दोनशे लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावापासून १८१८ मध्ये घेतला.

वारुगडाचे बांधकाम भक्कम आहे. किल्‍ल्‍याचा मुख्य फलटण दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. किल्ल्याच्या कमानी ढासळलेल्या आहेत. तटबंदीतील बुरूजांनाही तडे गेलेले आढळतात. उर्वरित तटबंदी सुस्थितीत आहे. किल्ल्याची विभागणी दोन भागांत करता येते. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला. बालेकिल्ला आकर्षक आहे. तिथून खालपर्यंत बांधलेली भिंत जमिनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
बांधणाऱ्याचे नाव :
राजा भोज
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’ चे पुढे वासोटा झाल असावे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजीच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे, याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते.

शिवाजीने जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजीच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
वर्ष :
अकराव्या शतकात
वैराटगड हा सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील किल्ला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन मंदिरे आहेत दोन हनुमानाची आणि एक वैराटेश्वराचे.

वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे गडमाथा फारच लहान आहे. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे.

साधारणतः २० ते २५ पायऱ्या चढून आपण गडावर पोहचतो. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे. तिची रुंदी साधारण १० फूट आहे. गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे ह्यातून म्हसव गावाकडे उतरता येते. त्याच्या जवळच एक उंचवटा आहे. तेथे दगडावर अस्पष्ट असे लिखाण आहे. गडाच्या आजुबाजूला अनेक अवशेष इतस्थतः पसरलेले आढळतात.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

2 comments

  1. Pingback: comedy los angeles today

  2. Pingback: lotto w88

Leave a Reply