गुरुदास बंगला,
रामवाडी , सीता गुंफा ,
नाशिक – ४२२००५
दि. १४/७/२०१८.
प्रिय बाबांना
सप्रेम साष्टांग नमस्कार.
पत्र पाठवण्याचे कारण की, आमच्या शाळेची सहल पुढच्या महिन्यात भंडारदऱ्याला जाणार आहे. दोन दिवस व एक रात्र एवढा सहलीचा कालावधी आहे. ५ डिसेंबरला सकाळी आम्ही शाळेतून निघणार आहे व ६ डिसेंबरला रात्री परत येणार आहोत.
मला शाळेतून सहलीला जायचे आहे. त्यासाठी तुमच्याकडून परवानगी असलेले पत्र माझ्या वर्गशिक्षकांना हवे आहे. तरी कृपया तसे पत्र पाठवा. मी वाट पाहत आहे.
तुमचाच,
रमेश