शाळेत रजेसाठी विनंती पत्र

तुम्ही चार दिवस शाळेत अनुपस्थित राहणार आहात, त्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहा.

कु. योगिता जोग,
जुना आग्रा रोड,
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . ८ जुलै २०१८

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,
श्रीराम विद्यालय, नाशिक

सा. न. वि. वि.

मी कु. योगिता जोग इयत्ता ८ वी ( ब ) वर्गात शिकत आहे. दि. १५ डिसेंबर २०१८ रोजी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आहे. लग्न पुण्याला आहे. लग्नासाठी आम्ही सगळे १२ डिसेंबरला जाणार आहोत व १८ डिसेंबरला परत येणार आहोत. त्यामुळे मला १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत शाळेतून रजा मिळावी ही विनंती. या काळात माझा बुडालेला अभ्यास मी मैत्रिणींच्या मदतीने पूर्ण करीन ही खात्री देते.

तरी मला रजा मिळावी ही विनंती.

आपली नम्र,
कु. योगिता जोग,
८ वी ( ब )

admin

Leave a Reply

Next Post

वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र

Tue Apr 30 , 2019
कु. सायली भगत, साई-दर्शन इमारत, म्हसरळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . २८ जानेवारी २०१८ प्रति, माननीय मुख्याध्यापक, अभिनव विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. विषय – वाचनालयातून पुस्तके घरी घेऊन जाण्यासाठी विनंती-पत्र मी कु. सायली भगत आपल्या शाळेची ९ वी (ब) ची विद्यार्थीनी आहे. मला वाचनालयातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या […]
WhatsApp chat
%d bloggers like this: