शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय एससीएच/1082/4199 विशि-3, दि. 13/08/1985 अन्वये सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचा प्रकार : राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावीरल विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयामध्ये पी. एच्. डी. करता यावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देश : राज्यातील विद्यार्थ्यांना पी. एच्. डी. पुर्ण करता यावी.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.श्शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत प्राप्त आवेदनपत्रांची छाननी करू न गुणवत्तेनुसार विहित तीन संचांची निवड केली जाते.
 • 2. महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यांनी गठित केलेल्या समितीमार्फत पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून त्यांना विहित केलेल्या संचास अधिन राहून प्राचार्यांकडून निवड केली जाते.
 • 3. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
 • 4.संबंधित छात्र कोठेही सेवेत नसावा. तसेच त्यांनी इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
 • 5. संबंधित विद्यार्थ्याने पी. एच्. डी. संबंधी विद्यापीठामध्ये रीतसर नोंदणी करू न संबंधित मार्गदर्शकाने शिफारस करणे आवश्यक आहे.
 • 6. महाविद्यालयीन स्तरांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून विहीत केलेल्या संचाच्या अधीन राहून प्राचार्यांमार्फत निवड केली जाते.
 • 7.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • 8.सदर शिष्यवृत्ती चे राज्य स्तर 3 व महाविद्यालयीन 11 संच आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विहित नमुन्यातील आवश्यकती कागदपत्रे
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. अधिछात्राची त्याच्या मार्गदर्शकामार्फत त्याचा वार्षीक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : पी. एच्. डी प्रतिवर्ष- 9000/- व रु 1000 सादीलवार खर्च रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.श्
अर्ज करण्याची पद्धत : नवीनमंजूरी/नुतनिकरणसाठी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे असे विद्यार्थी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज सद्यस्थितीत ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट ते मार्च पर्यंत असतेे. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 10 महिने)
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.

admin

Leave a Reply

Next Post

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती

Sat May 4 , 2019
अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती २ योजने बद्दलचा शासन निर्णय : एससीएच/1082/151160/2173/जनरल-5, दि. 07/05/1983 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी एक संच निर्धारित केला आहे. ३ योजनेचा प्रकार : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नवी दिल्ली त्यांचेकडून विहित नियमानुसार निवड करुन त्या विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांमधून एका […]
WhatsApp chat
%d bloggers like this: