Home / Maharashtra Tourism / संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर पण मुंबईच्या पंचक्रोशीत हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ वर्ग किमी आहे.येथील कान्हेरी लेण्यांमुळे(कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ ब्रिटिश आपदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. चे “कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान” निर्माण झाले. १९७४साली त्याचे नामकरण ‘बोरिवली राष्ट्रीय उद्यान’ असे झाले. १९८१ मध्ये नावाचे बदल करून ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ असे त्याचे नामकरण झाले.

जैव विविधता

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच मुंगूस, उदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर, निवडुंग, बांबूची बेटं आढळतात.

सुविधा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते. येथे प्रवेशासाठी प्रौढांना रु. २०/- तर लहान मुलांना रु. १०/- प्रवेशशुल्क आहे. पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी शुल्क आकारले जाते. सिंहविहार आणि वनराणी मिनी टॉय ट्रेन सफारीचे आकारले जाते. उद्यानात वननिवासाची सोय असून त्याकरिता विश्रामगृह आणि कुटीर पद्धतीची निवास व्यवस्था आहे.

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.

मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

Check Also

lenyadri girijatmaj

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात …

vighneshwar ozar

विघ्नेश्वर ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात …

mahaganpati rangangav

महागणपती रांजणगाव

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर …

siddhivinayak siddhatek

सिद्धिविनायक सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. …

Leave a Reply