समाजसुधारक : बाबा आमटे

समाजसुधारक : बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ – फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
त्यांचे महाविदयालयीन शिक्षण नागपुर येथे झाले.१९३४ साली बाबांनी बी ए ची पदवी संपादन केली त्यानंतर १९३६ साली त्यांनी एल एल बी ही पदवी संपादन केली १९४९-५० या काळात त्यांनी कुष्टरोगनिदानवरील त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण केला महात्मा गांधीच्या सेवाग्रम आश्रमात राहत असताना गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यात बाबांनी स्वःताला झोकून दिले १९४३ मध्ये वंदे मातरम ची घोषणा दिल्याबद्द्ल त्यांना २१ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला स्वतंत्र्यप्राप्तीनंतर कुष्टरोग निर्मूलनाच्या कार्या बरोबरच त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गाने आंदोलने केली तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये ‘भारत जोड़ो ‘ अभियान योजले होते. नर्मदा बचाव या आंदोलनात तब्बल १२ वर्ष नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी या आंदोलनाला पाठबळ दिले होते.

बाबांनी कुष्टरोगासारख्या महाभयंकर रोगने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करण्याचे अतिकठिन व्रत बाबांनी स्वीकारले त्यांच्या प्रणेतून १९५१ साली आनंदवन ची स्थापना झाली। मरणापेक्षा भयान आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते म्हणजे कुष्टरोग्याचे आयुष्य पण बाबांनी या सर्वाना अपलेसे करून घेतले महारोगी सेवासमिती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्यचा विस्तार केला सर्वांकडे पाहण्याचा समान दृष्टिकोण बाबांनी ठेवला आणि आज त्यांच्या आश्रमात सर्व जातिधर्माचे लोक आहेत केवळ कुष्ट रोग्यांसाठीच नाही तर मूकबधिर व् अंधांसाठी एक शाळा त्यानी उभारली आहे.

कुष्ट रोग्यांसाठी उपचार प्रशिक्षण व पुनर्वसन या करीता त्यांनी रुग्णालयाची व् अन्य प्रशिक्षण केंद्रांची निर्मिति केलि आहे तरुणांसाठी महाविद्यालयाची स्थापना प्रौढ़ व् अपंगांसाठी हातमाग सुतारकाम असे व्यावसायिक प्रशिक्षण बाबांनी त्याना देऊन आर्थिक स्वावलम्बनचा मार्ग दाखवला आहे घनदाट जंगल , दळणवळण , संपर्काची साधने नाहीत प्रचंड पाऊस पावसात मार्ग अडवून टाकणाऱ्या नद्या नाले ,जंगली स्वापदांचा सुळसुळाट अन्न वस्र निवार्याची कमतरता कहीवेळा शासनाचा असहकार असताना त्यात आदिवसींचे अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा अशी बिकट अवस्था असताना देखील प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली आहेत.

admin

Leave a Reply

Next Post

मदर टेरेसा

Sun Apr 28 , 2019
मदर टेरेसा जागतिक कीर्ती मिळविलेल्या जगातील महान महिला सध्याच्या काळातील एक असामान्य,थोर व्यक्ती,एक थोर समाज सेविका म्हणून ‘ मदर टेरेसा’ यामहिलेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.गोर-गरीब, अनाथ-अपंगअशा लोकांना आपले समजून जो प्रेमाने त्यांची सेवा करितो. तोच खरा साधू-संत होय. असे तुकाराम महारांनी एका श्लोकांत म्हटले आहे. त्या दृष्टी कोनातून विचार केला […]
WhatsApp chat
%d bloggers like this: