Amazon Big Sell

सशस्त्र दलातील नोकर भरतीसाठी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : सशस्त्र दलातील नोकर भरतीसाठी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र (22350098)
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्रमांक सैकवि-2001/1365/प्र.क्र. 119/(2001)/28 दिनांक 23/10/2001
योजनेचा प्रकार : शासकिय योजना
योजनेचा उद्देश : महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित, अशिक्षित बेरोजगार व स्यंरोजगाराची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत केंद्र शासनाच्या सशस्त्र दलातील नेाकरभरतीसाठी महाराष्ट्रातील युवकांना या केंद्रामार्फत सेनादलातील प्रवेशासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या येाजनेखाली राज्यात जिल्हयाच्या ठिकाणी जिथे भरती कार्यक्रम असेल अशा जिल्हयासाठी सेवापूर्व प्रशिक्षण 50 प्रशिक्षणार्थी प्रति शिबीर याप्रमाणे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. प्रत्येक जिल्हयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसलेने जास्तीत जास्त प्रशिक्षण माजी सैनिक महामंडळ संचलित भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सातारा,बुलडाणा व महासैनिक प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथे चालविण्यात येतात. प्रत्येक शिबीराचा कालावधी 15 दिवसाचा असून प्रशिक्षणार्थ्यांना मोफत राहण्याची -जेवणाची सोय करण्यात येते. संचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमाचे नियंत्रक अधिकारी आहेत
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : महाराष्ट्रातील सर्व तरुणाना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • 2. सैन्य दलामार्फत आयेाजित विविध पदाच्या भरतीसाठीच्या अटी पुर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : सैन्य भरती साठी आवश्यक असणारी शैक्षणिक व इतर कागदपत्रे
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या केंद्रात निवास व भोजनासह 15 दिवसाचे आवश्यक प्रशिक्षण.
अर्ज करण्याची पद्धत :

  जिल्हा स्तरावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे मार्फत तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सातारा व महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांचे मार्फत सैन्य दलातील विविध पदासाठी आवश्यक शारिरीक/शैक्षणिक पात्र उमेदवारांची निवड प्रशिक्षणासाठी केली जाते.

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 15 दिवस कालावधीचे प्रशिक्षण
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : माजी सैनिक महामंडळ संचलित भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सातारा,बुलडाणा व महासैनिक प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: On line अर्ज करण्याचे संकेत स्थ्ळ अदयाप सुरु करण्यात आलेले नाही

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

  Leave a Reply