सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे.सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

प्राचीन इतिहास

भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो. मराठ्यांच्या पूर्वी जिल्ह्यावर आदिलशाही राजवट होती.

अर्वाचीन इतिहास

जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी  होते, ते बदलून  ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला  हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली  हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन  म्हणून घोषित करण्यात आला.

चतुःसीमा

 • पश्चिम – अरबी समुद्र
 • पूर्व- कोल्हापूर जिल्हा
 • दक्षिण- गोवा राज्य
 • उत्तर- रत्नागिरी जिल्हा

जिल्ह्यातील तालुके व नद्या

 • कणकवली तालुका
 • कुडाळ तालुका
 • देवगड तालुका
 • दोडामार्ग तालुका
 • मालवण तालुका
 • वेंगुर्ला तालुका
 • वैभववाडी तालुका
 • सावंतवाडी तालुका

नद्या

 • शुक
 • कर्ली
 • गडनदी
 • तेरेखोल
 • आचरा
 • तिल्लीरी
 • देवगड

प्रेक्षणीय स्थळे

 • आचार खाडी (बेकवाटर)
 • आंबोली थंड हवेचे ठिकाण
 • कुणकेश्वर मंदिर (देवगड)
 • तेरेखोल किल्ला
 • देवगड किल्ला व दीपगृह
 • राजवाडा (सावंतवाडी)
 • विजयदुर्ग किल्ला
 • संत राऊळ महाराज मठ कुडाळ
 • सावडाव धबधबा
 • सिंधुदुर्ग किल्ला
 • सुवर्ण गणेश मंदिर मालवण

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply