Amazon Big Sell

सुमारगड

सुमारगड हा नावाप्रमाणेच “सुमार” आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे.

रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.

किल्ल्यावर वर पोहोचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते.

एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर, दुसरी टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते.

या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बर्‍याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.
www.apollonia

Asha Transcription

About admin

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …