Amazon Big Sell

सूर्यनमस्काराचे फायदे

• शरीराचे स्वास्थ्य सुधारते सूर्यनमस्कार ही 12 आसनांची मालिका असल्याने, खास वेळ काढून व्यायाम करू शकत नसलेल्यांसाठी हा एक परीपूर्ण आहे. योग्य प्रकारे व नियमित सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक व मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.

• पचनशक्ती सुधारते सूर्यनमस्कार करताना पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन असे पचनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी सकाळी नियमित रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार करावेत. यामुळे पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते.

• आकर्षक अॅब्स मिळण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे पोटाजवळील स्नायूंचा व्यायाम होतो. नेहमीच्या वर्कआऊट सोबतच सूर्यनमस्कार केल्याने पोटाजवळील चरबी कमी होण्यास मदत होते.

• शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते सूर्यनमस्कार करताना सतत दीर्घश्वसन केल्याने व उच्छश्वास बाहेर सोडल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे रक्त शुद्धीकरण होते. तसेच शरीरातील कार्बन डायऑक्साईड व विषारी वायू बाहेर पडण्यास मदत होते. (शरीर नैसर्गिकरीत्या डीटॉक्स करा या ’5′ पदार्थांनी !)

• मनाची अस्थिरता कमी होते सूर्यनमस्कारामुळे स्मरणशक्ती सुधारते व मज्जासंस्था शांत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारल्याने मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते.

• लवचिकता वाढते सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याने तो नियमित केल्यास शरीर निरोगी व लवचिक बनते.

• मासिक पाळीचे चक्र सुधारते अनियमित मासिकपाळीची समस्या असलेल्या स्त्रियांनी नियमित सूर्यनमस्कार केल्यास या समस्येतून आराम मिळतो. तसेच सूर्यनमस्कारामुळे गर्भारपणानंतर प्रसुती सुलभ होण्यास मदत होते. ( वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय)

• चिरतरूण राहण्यास मदत होते सूर्यनमस्कारामुळे त्वचेची कांती सुधारते तसेच वृद्धपकाळात चेहर्यावर पडणार्या सुरकुत्यांपासून सुटका होते. या व्यायामप्रकारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो परिणामी सौंदर्य सुधारण्यास मदत होते.

• वजन घटवण्यास मदत होते डाएटींगपेक्षा सुरक्षित व झटपट वजन घटवण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार! सूर्यनमस्कारामुळे शरीराचा कार्डीओ व्हसक्युलर प्रमाणेच व्यायाम होतो व वजन कमी होण्यास मदत होते. पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. ( वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना) सूर्यनमस्कार आरोग्यदायी व्यायामप्रकार असला तरीही खालील काही व्यक्तींनी ‘सूर्यनमस्कार’ टाळलेलाच बरा –

• गर्भवती स्त्रिया – गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यांनंतर गर्भवती स्त्रीने सूर्यनमस्कार करणे टाळा.

• हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करू नये.

• मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया तसेच मुलींनी सूर्यनमस्कार टाळावा.

• पाठदुखीची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply