Amazon Big Sell

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शा.नि. क्र. शिष्यवृ-2008/(254/08)/ मशि-6 , दिनांक 22 जानेवारी, 2009.
योजनेचा प्रकार : महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांसाठी
योजनेचा उद्देश : उच्च गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. इ. 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैंकी टॉप 20 पर्सेंटाईल विद्यार्थ्यांची नावे संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित केली जातात.
 • 2. सदर योजनेसाठी नवीन मंजूरीस्तव अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे नाव सदर यादीमध्ये नमुद असणे आवश्यक आहे.
 • 3. अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
 • 4. विद्यार्थ्यांने पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
 • 5. पदविका (Diploma), दुरस्थ अभ्यासक्रमांसाठी (Distance Education), प्रवेश घेतलेले विद्यार्थी सदर योजनेसाठी अपात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. बारावी पास झाले असलेबाबतचे प्रमाणपत्र.
 • 2. शाळेत प्रवेश घेतले बाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • 3. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 4. महाविद्यालयास भरलेली फी प्रदान पावती / रिसीप्ट.
 • 5. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 6. आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • पदवी स्तर (3 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 10,000/-
 • पदव्युत्तर पदवी (2 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 20,000/-
 • सदर रक्कम ही मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत :

  नवीन मंजूरीस्तव ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे असे विद्यार्थी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज सद्यस्थितीत ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.scholarships.gov.in

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

  Leave a Reply