Amazon Big Sell

होळी

होळी हा एक महत्वाचा सण आहे . होळीचा सण म्हणजे उत्साह व उल्हास हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येतो.
प्रत्येक गावात होळीसाठी एक जागा ठरलेली असते . तिला होळीचा माळ असे म्हणतात. तेथे एक खड्डा खणतात . त्यात झाडाची एक फांदी उभी ठेवतात . फांदीभोवती लाकडे रचतात. तिला फुलांनी सजवतात . हीच होळी होय.
संध्याकाळी तेथे सर्व लोक जमतात. होळीची पूजा करतात. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
पूजा झाल्यावर होळी पेटवतात. मग लोक होळीभोवती नाचतात . गाणी म्हणतात. होळीत सर्व वाईट गोष्टी जाळून जातात , असे लोकांना वाटते.

होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो . या दिवशी लोक एकमेकांवर रंग उडवतात. आनंदाने नाचतात. मी आणि मित्र सकाळपासून रंग घेऊन फिरतो. एकमेकांना खूप रंगवतो . खूप मजा येते. होळी हा सण मला खूप आवडतो .
अशी गोष्ट सांगितली जाते की हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे नाव होलिका असे होते. अग्नीपासून तुला मुळीच भय रहाणार नाही असा तिला वर प्राप्त झाला होता.या वराचा दुरुपयोग करुन तिने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याकरिता त्याला मांडीवर घेऊन स्वतः धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु परिणामाअंती तीच स्वतः जळून खाक झाली व भक्त प्रल्हाद याला काहीही इजा न होता तो सुखरुपपणे अग्नीतून बाहेर पडला. तो दिवस म्हणजे फाल्गुन शुध्द पौर्णिमा.
या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून भोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गोव-या ठेवून त्यात एरंडाची फांदी ठेवतात. पूजा करण्यापूर्वी ती पेटवतात. पेटल्यानंतर पुरुष हळद-कुंकू अक्षता वगैरेंनी होळीची पूजा करतात. होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालतात. बायका पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीला हळद-कुंकू वाहून होळीत पुरणाची पोळी टाकतात. ह्या मागील उद्देश हाच असतो की उन्हाळयाच्या दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते. तेव्हा अग्नीला शांत करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच उन्हाळाही कडक भासू नये म्हणून वरीलप्रमाणे अग्नीदेवतेची पूजा करतात. हा सण सर्वत्र संध्याकाळी किंवा रात्री साजरा करतात.
ह्या दिवशी मुख्यतः स्वयंपाकात पुरणपोळी करतात.

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.