५० लोकांच्या जेवणाची मागणी करणारे पत्र लिहा

५० लोकांच्या जेवणाची मागणी करणारे पत्र लिहा.

नचिकेत दिघे,
३५, शैलेन्द्रनगर, गोरेगाव,
जळगाव – ४४०००५
दि . १६ जून २०१८

प्रति,
माननीय व्यवथापक,
‘मेजवाणी खाद्यसेवा’,
जळगाव शहर विभाग,
जळगाव – ४२५००१

विषय: ५० लोकांच्या जेवणाची मागणी.

महोदय,

ह्या महिन्याच्या २५ तारखेला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी माझ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला जेवणाचे आमंत्रण दिले आहे. मी जेवणाची मागणी आपल्याकडे नोंदवू इच्छितो. तरी २५ तारखेच्या ५ वाजेपर्यंत ५० लोकांसाठी मागवले पदार्थ दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. पदार्थींची यादी खालीलप्रमाणे आहे :

१. मटार – पनीर भाजी

२. मसाले भात

३. कोशिंबीर

४. लोणचे – पापड

५. ५० लोकांसाठी रोटया

जेवणाच्या वाटपाची व्यवस्था तुम्ही करावी. तुम्ही सांगितलेला खर्च पत्रासोबत पाठवलेला आहे. तरी कृपया दिलेल्या पदार्थींची यादी वेळेवर पाठवावी.

आपला विश्वासू,
नचिकेत दिघे

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply