मुक्ताबाई

मुक्ताबाई

मुक्ताबाई (जन्म: आळंदी, महाराष्ट्र, इ.स.१२७९ — मृत्यू: मेहूण (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संतव कवयित्री होत्या. या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आपला भाऊ संत ज्ञानेश्वरांना बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरु मानले होते. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

जीवनपट

जन्म – आश्विन शुद्ध प्रतिपदा(घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा – मातापित्यांचा देहत्याग – ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद – विसोबा खेचर शरण आले – शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. – ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी – ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती – मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’चा अर्थ सांगितला. – मुक्ताबाईचा पहिला शिष्य – चांगदेव – नामदेवांची भेट – गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव – अमृत संजीवनीची प्राप्ती – चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान – निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास – तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट – ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) – सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) – चांगदेवांची समाधी (पुणतांबे) – आपेगावी मुक्काम – वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम – ‘ज्ञानबोध’ ग्रंथाची निर्मिती – तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी)

साहित्य

मुक्ताबाईचे स्वत:चे साहित्य

मुक्ताबाईचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. हिची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

मुक्ताईंवरील लेखनसंपादन करा

कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी – ललितेतर संशोधन अभ्यासग्रंथ – लेखिका केतकी मोडक

READ  शिर्डीचे साईबाबा (Sant Saibaba Maharaj)

मुक्ताई – लेखिका : मंदा खापरे (कादंबरी)

मुक्ताई – मृणालिनी जोशी (ललित)

मुक्ताई – शांता परांजपे (ललित)

मी बोलतेय मुक्ताई – नीता पुल्लीवार (ललित)

आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मीक)

धन्य ती मुक्ताई – सुमति क्षेत्रमाडे. (कादंबरी)

 

स्मृतिप्रीत्यर्थसंपादन करा

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून मुक्ताईनगर केले आहे.

पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.

 

%d bloggers like this: