घड्याळ नसते तर मराठी निबंध,भाषण, लेख – Ghadyal Nasate Tar

घड्याळ नसते तर..

घड्याळ नसते तर काय झाले असते, ऐकून भीती वाटते? जर घड्याळ नसेल तरी किती वाजले कसे कळणार. घड्याळ बंद पडले तर तर सकाळचा गजर कसा होणार. किती भीतीदायक वातावरण असेल, नाही का? आजच्या निबंधाचा / भाषणाचा विषय हाच आहे “घड्याळ नसते तर”. हा लेखाची सुरवात भाषणाने केली आहे, बाकी माहिती निबंधाच्या फॉरमॅट मध्ये आहे. तुम्ही तुमच्या गरजे नुसार दिलेल्या माहिती मध्ये बदल करू शकता.

भाषणाची सुरुवात

वेळ अमूल्य आहे, वेळ म्हणजेच पैसा; असे आपण खूप वेळा ऐकलं आहे. आपण ठराविक वेळेत शाळेत येतो, ठराविक वेळेचे लेक्चर्स असतात. शनिवारी तर सकाळची शाळा असते, नेहमीपेक्षा लवकर उठावे लागते, नाही का? कल्पना करा जर घड्याळ नसतेच तर, किंवा घड्याळ बंद पडले तर. याच विषयावर मी आज तुमच्या समोर बोलणार आहे.

घड्याळ असण्याचे फायदे

घड्याळाचे काम काय असते? वेळ दाखवणे. किती वाजले, किती तास, मिनिटे झाली. या साध्याश्या यंत्रामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर होते. साल १९२७ मध्ये वॉरेन मार्रीसोन आणि ज.व. हॉर्टन यांनी बेल टेलेफोन लॅबोरेटरी मध्ये क्वार्ट्ज (quartz) घड्याळाचा शोध लावला. क्वार्ट्ज हा एक क्रिस्टल ऑसीलेटर किंवा आंदोलक आहे, जे अतिशय तंतोतंत वारंवारितेसह सिग्नल तयार करते, ज्यामुळे क्वार्ट्ज ची घड्याळे यांत्रिक घड्याळांपेक्षा अचूक सिग्नल्स देतात. क्वार्ट्ज ला सिलिकॉन डायओकसाइड सुद्धा म्हटले आते आणि हे एक पीएझोइलेक्ट्रिक मटेरियल आहे. या तंत्राने माणसाचे जीवन सुखकर बनवले.

जर आज घड्याळ बंद पडले तर (कायमचे)

कुठल्याही वस्तूची, अनुभवाची आपल्याला सवय होते, आणि ती अचानक बंद झाली, थांबली तर कोणाचीही अव्यवस्था होणार. तसेच, घड्याळाचे आहे. जर घड्याळ कायमचे बंद पडले तर, आपल्याला वेळ कळणार नाही, सर्व कामाच्या वेळा चुकतील. वेळाची नोंद ठेवावी लागेल, सकाळी उठवण्यासाठी क्लॉक / गजर नसेल, सूर्य देवावर आपण अवलंबून असू. परत एकदा आरवाता कोंबडा पाळावा लागेल.

READ  मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

या सर्वाने अडचण, त्रास नक्कीच होईल पण माणूस हा एक झुंजारू प्राणी आहे, आपण हळू हळू याची सवय करून घेऊ. विसरू नका कि, माणूस ही प्रजात त्याच्या बुद्धी साठी ओळखली जाते, कोणीतरी वेळ मोजण्याचा नवीन प्रकार अवगत करेल.

घड्याळ नसतेच तर

घड्याळे बनण्याच्या अगोदरही आयुष्य व्यवस्थित चालायचे. पृथ्वी वरती माणसाची वसाहत हजारो वर्षांपासून आहे, आणि तेव्हा घड्याळ नव्हते. पुरातन काळात लोक सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांच्या सहाय्याने वेळ मोजत असत. खूप लोकांना हे माहीत नाही की, वेदिक काळातही खूप अवगत वेळ मोजण्याची प्रणाली होती, अगदी परमाणु (१७ मैक्रोसेकंड्स) ते महा-मन्वंतर (३११.०४ ट्रिलियन वर्षे). तेव्हा २४ तास म्हणजे दिवसाला अहोतरम मध्ये मोजत, तर आजचे १.६ मिनिट्स म्हणजे “एक लघु” असे. त्याच प्रमाणे एक मास म्हणजे १ महिना, अयान म्हणजे ६ महिने, आणि समवत्सर म्हणजे वर्ष.

निष्कर्ष

जर घड्याळ नसते तर किंवा घड्याळ बंद पडले तर नक्कीच सगळ्यांना त्रास होईल, पण आयुष्य थांबणार नाही. मनुष्य प्राणी नवीन किंवा जुन्या पद्धती वापरून यावर तोडगा जरूर काढेल.

%d bloggers like this: