मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays निबंध लेखन हा विद्यार्थ्याच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे, अगदी प्राथमिक शाळेपासून MPSC च्या परीक्षेपर्यंत निबंध लिहावे लागतात. एवढेच नाहीतर काही फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन साठी सुद्धा निबंध लिहायला लागतात. पुढे, जाऊन काही जॉब्स मध्ये देखील निबंध, थिसीस, लेख, स्टोरीज लिहाव्या लागतात.

माणूस हा विचारशील प्राणी आहे, खूप सारे विचार त्याच्या मनात सतत दवडत असतात. पण जर का ते विचार दुसऱ्याला सांगायचे असतील, पटवून द्यायचे असतील तर त्या विचारांची सुयोग्य गुंफण करता येणे खूप गरजेचे असते. आणि हेच काम निबंध करते, म्हणून निबंधाला शैक्षणिक क्षेत्रात एवढे महत्व आहे. विद्यार्थी निबंध लेखनाने लेखन शैली, विचारांची मुद्देसूद मांडणी शिकतात. हे कौशल्य तुम्हाला तुमच्या भविष्यातही उपयोगी पडू शकते. पण विचारांची, मुद्दे, त्यातही, मत, अनुभवांची मांडणी योग्य भाषेत आणि योग्य संरचनेत करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays

आज इथे आपण शिकणार आहोत कि मराठी निबंधांचे किती प्रकार आहेत, आणि ते कसे लिहायचे. तसे तर निबंधाचे खूप प्रकार आहेत, पण इथे आपण त्यांना मोजक्या श्रेणीत मांडण्याचा प्रयत्न करूयात.

  • वर्णनात्मक निबंध (Descriptive Essay)

वर्णनात्मक निबंधामध्ये लेखकाला शब्दांनी चित्र रंगवायचे असते, लेखक यातून व्यक्ती, भावना, जागा, अनुभव, वस्तू, परिस्थिती, आठवणी यांचे वर्णन करू शकतो. वर्णनात्मक निबंधामध्ये फक्त नावापुरते वर्णन न करता, शब्दांतून वाचकाच्या हृदयात हात घालायचा असतो. इथे विषयाचे वर्णन शब्दांनी रंगवावे लागते, आणि ते चित्र वाचकाला दिसून आलं पाहिजे.
उदाहरणे : माझा पहिला प्रवास, मला पडलेलं स्वप्न, माझा मित्र

  • कथा निबंध (Narrative Essay)

कथा निबंधामध्ये लेखक स्वतःच्या अनुभवातून गोष्ट सांगतो. तसा हा निबंध प्रकार वरकरणी सोपा वाटतो पण या मध्ये लेखकाला आपल्या अनुभवांबद्दल विचार करावा लागतो, त्यांची योग्य सांगड घालून योग्य शब्दांचा वापर करावा लागतो. अधिकांश वेळा कथा निबंध प्रथम पुरुषामध्ये लिहतात, मी, माझा असे शब्द वाचकाला तुमच्या निबंधातल्या गोष्टीत गुंतवून ठेवतात.
उदाहरणे: शाळेचा पहिला दिवस, उन्हाळ्याची सुट्टी,

  • विवरनात्मक निबंध (Expository / Explainotary Essay )

विवरनात्मक निबंध या प्रकारामध्ये लेखक दिलेला विषय मांडतो व तथ्ये आणि योग्य उदाहरणे, पुराव्यानी पटवून देतो. हा निबंध प्रकार तुम्हाला थोडासा वर्णनात्मक निबंधाचा सारखा वाटेल पण या प्रकारमध्ये तुम्हाला तथ्ये आणि पुरावे द्यायचे असतात; यात लेखक आपल्या भावना नाही दाखवू शकत. सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त, तुलना आणि विरोधाभास, कारण आणि परिणाम, श्रेणीकरण आणि वर्गीकरण निबंध सुद्धा या प्रकारात मोडतात.
उदाहरणे: जीएसटी चे परिणाम, विमुद्रिकरण: शाप कि वरदान, इंटरनेट चे महत्व आदी

  • प्रेरक निबंध (Persuasive Essay)

या प्रकारामध्ये वाचकाला तुमचा विषय किंवा मुद्दा पटवून द्यायचा असतो, पण तथ्ये आणि पुराव्यांसोबत. यात तुम्ही दिलेला विषय मांडता आणि तो उदाहरणे, डेटा, रेफेरेंन्सस द्वारे पटवून देता. यात तुम्ही मुद्द्याच्या दोन्ही बाजू मांडू शकता पण त्या पटवून देता आल्या पाहिजेत. थोडक्यात लेखकाला वाचकाचे मन वळवायचे असते.
उदाहरणे: जातीवाद, आरक्षण, जीएसटी, सोशिअल मीडिया आदी

READ  भ्रष्टाचार

निबंधांचे आणखी काही पोट प्रकार आहेत, जसे व्याख्या, कारकीर्द, एडिटोरिअल्स, ओपेड्स, पिक्टोरल ऐसे इत्यादी पण ते वर दिलेल्या मूळ प्रकारांमध्ये मोडतात.

आम्ही आशा करतो कि या लेखामध्ये तुम्हाला विवीध निबंधांचे प्रकार कळले असतील आणि याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात उपयोग होईल. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर खालीदिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता, किंवा हि माहिती शेअर हि करू शकता. धन्यवाद!!

 

%d bloggers like this: