नोकरी साठी अर्ज

उच्च शिक्षण संपताच तरूणवर्ग नोकरी शोधण्याच्या दिशेकडे वळतो. रोज एका ना एका संस्‍थेत नोकरीसाठी अर्ज करणे सुरू असते. काही अर्ज स्वीकारले जातत तर काहींना केराची टोपली मिळते. अनेकांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्या कारणाने त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाही. तर, अशा तरूणवर्गासाठी नोकरीचा अर्ज कसा करावा, याच्या काही टिप्स आम्ही येथे देत आहोत.

*प्रति
आपण नोकरीसाठी अर्ज कोणत्या संस्थेत करत आहे. तेथील प्रमुख व्यक्तीचे नाव, पद, कंपनी हे अर्जाच्या डाव्या बाजूला सुरुवातीला असायला हवे. तसेच उजव्या कोपर्‍यात अर्ज करत असलेल्या दिवसाची दिनांक लिहिणे आवश्यक आहे.

*विषय
आपण अर्ज कोणात्या पदासाठी करत आहोत.

त्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी.
उदा. विषय: मी……..या पदासाठी अर्ज करत आहे.

*आदर
ज्या संस्था, कंपनीत अर्ज करणार आहोत त्यांच्याविषयी आदरणीय महोदय, किंवा सप्रेम नमस्कार असे आदरपुरक शब्द लिहावे.

*स्वतःची माहिती
पुर्ण नाव : ………………………………………….

पत्ता : ………………………………………….

शिक्षण : …………………………………….पदवी …….

कोणत्या विघापीठातून झाले ही सर्व माहिती द्यावी

कामाचा अनुभव ……………… किती वर्षांचा…………..

विषयाची आवड : ………………………………….

ई-मेल आयडी …………………………. मोबाईल नं …………………………

इतर गोष्टींचे शिक्षणः ……………………………………………………..

*विनंती
आपल्याला नोकरीची गरज असल्याने शेवटी नोकरीच्या मागणीसाठी आदरपूर्वक विनंतीचा उल्लेख करावा. तसेच सोबत स्वत:ची व्यक्तीगत माहिती जोडत आहे, असा उल्लेख करावा. शेवटी डाव्या बाजूला कळावे, असा उल्लेख करावा.

*स्वाक्षरी
संपूर्ण अर्ज लिहून झाल्यानंतर अर्जादाराने स्वतःची सही करावी.

हल्ली नोकरीसाठी अर्ज ई-मेलवरूनच केला जातो. पण, तरीही प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस त्या त्या कंपनीचा लेखी अर्ज भरावा लागतोच. तो देखील अतिशय काळजीपूर्वक भरून द्यावा. विशेषतः आपल्या आवडीचे विषय, आधी केलेल्या कामाचा काही अनुभव, तेथील ओळखीच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अतिशय बिनचूक लिहावा, जेणेकरून आपली निवड झाल्यास आपल्याशी संपर्क साधणे सोपे जाईल.

READ  मला पंख असते तर
%d bloggers like this: