माझी आई मराठी निबंध, भाषण, लेख

“Majhi Aai” is one the most asked essay on speech topic in Marathi. You can expect it in exams, speech or essay competition and even for article and paragraph writing. There are hundreds of sample essays on My mother in Marathi and other languages out there on the internet, here we tried to a different angle. A typical essay, speech discuss what mothers do at home, how they take care and all. We tried to make it little different by making it relevant to today’s time and situations around us. Here we chose a theme of selfies, social media, neglected parents, their hidden love etc. We hope you will like it. This essay is suitable for students of class 6,7,8,9,10. We have also written a small 10 to 15,20 lines short essay which will be suitable for kids of class 1,2,3,4,5 etc.

या लेखामध्ये आपण माझी आई या विषयावर बोलणार आहोत, माझी आई हा शाळेत सगळ्यात जास्त विचारला जाणारा निबंध किंवा भाषण असते. थोडाफार बदल करून खालील दिलेली माहिती तुम्ही निबंध, भाषण रूपात वापरू शकता. तर, चला विषयाला सुरुवात करूयात.


निबंध क्रमांक १

“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”, हे आपण ऐकलं आहेच, पण खरोखर कधी मानलं आहे का? आई सारखी ओरडत असते, हे कर ते नको करू, दिवसभर उन्हातून खेळून घरी उशिरा आलं की पाठीत धपाटा ही मारते; आपण नेहमीच आई बद्दल तक्रार करत असतो, नाही का?

पण मग तो दिवस येतो, जेव्हा आपण शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी घरा बाहेर पडतो. आता कोणी ओरडायला नाही, किती मज्जा ना. असते खरंच मजा, पण पहिले दोन दिवस फक्त. आणि मग ते मेस चे जेवण, चुकून कापलेलं बोट, आईची आठवण काढते. आता तर मोठे झालो आहोत म्हणून अश्रू रोखतो, पण नंतर ढसा ढसा रडतो. घराचे वेध लागतात. कॉलेज सुरु होऊन चार दिवस नाही झाले तर लगेच घराकडे पळ काढतो. आई शेवटी आई असते, तिला कळत तुम्ही का आला आहात, तुम्ही आता मोठे झालात, मान्य करणार नाही की आईची आठवण आली. पण आईला ते माहित असत. बाबा ओरडतात, आई काहीही बोलत नाही. स्वयंपाक घरात तुमचे आवडते जेवण, गोड धोड बनवत असते. अशी असते आई.

पण आताच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशिअल मीडिया च्या जाळयात असे काही गुंततों की आई वडिलांचे प्रेम कधी कळतच नाही. ज्यांनी हजारो रुपये भरून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून इंग्लिश मिडीयम शाळेत टाकले अशा आई, वडिलांना इंग्रजी येत नसेल तर आपल्याला त्यांची लाज वाटते. सोशिअल मीडिया वर कूल वाटण्यासाठी, हैप्पी मदर्स डे ची आई सोबतची सेल्फी पोस्ट करतो, पण आईला कधी सामोरा-समोर विश करत नाही. आई स्वयंपाक घरात भांडी घासत असते आणि आपण सेल्फी वरचे लाइक्स मोजत असतो. एक प्रश्न विचार स्वतःला, आई वडिलांची किंमत मात्र सेल्फी एवडीचं राहिली आहे का?

या २१ व्या शतकात, स्त्रियाही उच्च शिक्षण घेत आहेत, घरा बाहेर पडत आहेत, नोकरी करत आहेत. वडिलांसारखेच आई ही घराची जबाबदारी घेत आहे. स्त्री आता पुरुषांच्या सामान आहे. मला तर, नोकरी करून घर सांभाळनाऱ्या आईचे कौतुक वाटते. घर, मुलं, नाती सांभाळणंच इतकं कठीण असते, ही सारी कर्तव्य पार पाडून ती आई नोकरी पण करते. चांगल्या करिअर साठी झगडत असते. एवढं सगळं फक्त एक आईच करू शकते. कुठून येते तिच्यामध्ये एवढी हिम्मत आणि ताकत? कधी विचार केला आहात  का? आपल्या मुलांवरचे प्रेम, घरावरचे प्रेम तिला ती ताकत देत. आपणही तिला साथ देऊयात, तिची हिम्मत वाढवूयात.

भाग्यवान आहोत की आपल्याला प्रेम करणारे आई वडील आहेत, जरा विचार करा त्या अनाथ मुलांचा. त्यांना विचारा आई वडिलांची किंमत. उद्या आपण मोठे होऊ, आज ना उद्या ती आपली साथ सोडून जाईल, तेव्हा रडत बसण्यापेक्षा आज आपल्या आईवरचे प्रेम व्यक्त करा. तिला घर कामात थोडी मदत करा, भाजीची जड पिशवी तिच्या हातातून घ्या. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तिला खूष करतील. जेव्हा कमवायला लागल तेव्हा पहिल्या पगारातून आई साठी एक साडी आणा. तिला साडीच कौतुक नसते, तिला तुमचं प्रेम कळत त्यातून.

READ  मराठी आत्मवृत्ते

पैसे कमावण्याच्या, मोठे होण्याच्या स्पर्धेत तुम्ही आई वडिलाना विसरून जाता, त्यांच्या कडे दुर्लक्ष करता. तुम्ही कितीही मोठे व्हा, जग जिंका पण जर का तुमची आई तुमच्या सोबत नाही तर, ते सगळं निरर्थक वाटत.

म्हणून, परत एकदा म्हणतो “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

निबंध क्रमांक २

माझ्या आईचे नाव सावित्री देशमुख आहे, ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. ती खूप सुंदर आणि प्रेमळ आहे. ती आमच्या सगळ्यांची खूप काळजी घेते. रोज सकाळी ती लवकर उठते, आमच्या साठी चहा, नाश्ता बनवते. मला शाळेची तैयारी करायला मदत करते. बाबांना आणि मला डबा भरून देते. आमच्या येथे स्कूल बस येत नाही, मग आई मला शाळेत सोडायला आणि नेत्याला सुद्धा येते.

एवढे सगळं आवरून ती नोकरी पण करते. ती एका मोठ्या आय टी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. ऑफिस मध्ये आईचा सगळे खूप आदर करतात. माझी आई सोसायटी ची अध्यक्षा सुद्धा आहे. ती एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कश्या सांभाळते याचे सर्वाना खूप आश्चर्य वाटते.

माझी आई मला होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. मी आजारी पडलो कि ती माझी खूप काळजी घेते. ती फक्त माझी आई नाहीतर मैत्रीण सुद्धा आहे. तिला वेळ मिळाला की ती माझ्यासोबत खेळते सुद्धा. आई खूप हसतमुख आहे, त्यामुळे घराचे वातावरण खूप चांगले राहते. माझे बाबा सुद्धा आईची खूप प्रशंसा करतात.

पण कधी कधी ती माझ्यावर चिढते सुद्धा. जर मी होमवर्क वेळेत पूर्ण केला नाही, उन्हात जास्त वेळ खेळलो तर ती मला ओरडते. तिला खोट बोललेणे आजिबात आवडत नाही. माझी आई खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे, त्यामुळे तिचे हे गुण थोडे माझ्या मध्ये सुद्धा आले आहेत. मी सकाळी वेळेत उठतो, वेळेत सगळा अभ्यास उरकतो, आणि यातून खेळासाठी हि वेळ काढतो.

READ  अनंत कान्हेरे

माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. तिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य सुद्धा आवडते. मराठी “नटसम्राट” आणि शेक्सपिअर चे “हॅम्लेट” खूप आवडते. तिच्या मुले मलाही वाचनाची आवड निर्माण झाली आहे, ती माझ्या साठी वेगवेगळी पुस्तके, कॉमिक्स आणते.

माझी आई आणि तिच्या दोन मैत्रिणी एक ब्लॉग सुद्धा चालवतात. तिथे त्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांसंबधित प्रश्न,समस्यांवर लिहतात. मागच्या वर्षी त्यांच्या ब्लॉग ला “बेस्ट मराठी ब्लॉग ऑफ द इयर” पुरस्कार सुद्धा मिळाला.

माझी आई जगातली सगळ्यात चांगली आहे, मला वाटते माझ्या आई सारखी आई सगळ्यांना मिळावी. ति माझी हिरो आहे, मला एक दिवस तिच्या सारखे बनायचे आहे, ती माझी प्रेरणास्थान आहे.

10 Lines Essay on My Mother, Majhi Aai in Marathi for Class 1,2,3,4,5

माझ्या आई वर माझे खूप प्रेम आहे. ती माझ्यावर कधीच ओरडत नाही. मी तिला आई म्हणतो आणि ति मला शोना म्हणते. माझी आई माझ्यासाठी जेवण बनवते. तिला चायनीज, दक्षिण भारतीय डिशेस बनवायला खूप आवडतात. सकाळी शाळेत जाताना ती मला नाश्ता बनवून देते, आणि स्कूल बस पर्यंत सोडायला सुद्धा येते.

माझी आई माझी खूप काळजी घेती. मी आजारी पडलो कि ती मला डॉक्टरकढे न्हेते, आली वेळेवर औषधे देते. माझी आई जॉब सुद्धा करते, ती एक मोठ्या आय.टी. कंपनीत काम करते. रात्री जेवणाआधी आई मला होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. ती खूप मस्त समजावून सांगते. माझी आई मला खूप आवडते, ती खूप सुंदर आहे, माझं माझ्या आई वर खूप प्रेम आहेत, आणि तीच माझ्यावर.

%d bloggers like this: