माझा आवडता सण – गणपती, गणेशोत्सव, गणेश चतुर्थी- मराठी निबंध, भाषण, लेख

MY FAVOURITE FESTIVAL – GANESH CHATURTHI

Majha Avadata San is one of the most common essays, speech topics in Marathi schools and sometimes in junior college too. There are numerous festivals Maharashtrians like e.g Diwali, Holi (Shimaga), Dasara, Shiv Jayanti etc. Here we have taken an example of Ganesh Chaturthi or famously called Ganapati Festival. You can find a lot of typical essays on given topic in Marathi Essay Books or over the Internet. Here we are trying to give you this essay or speech with little different perspective or style. We hope you will like it. we suggest you no to just copy paste given information, rather you can take an overall idea and make your own essay or speech script from it. So let,s get started. Shall we?

माझा आवडता सण – Essay on My Favourite Festival in Marathi

मराठी  माणसाला काही सण अगदी जीवापाड आवडतात. आपलय महाराष्ट्रात धर्माच्या सीमेपलीकडे जाऊन खूप सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात, जसे दिवाळी, होळी, दशहरा, दहीहंडी (जन्माष्टमी) गणेश चतुर्थी, ईद, आणि अगदी क्रिसमस सुद्धा. या पैकी होळी म्हणजेच शिमगा आणि गणपती मला सगळ्यात जास्त आवडतात पण गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे. माझा आवडता सण दिवाळी

गणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी आहे. शालेय विद्यार्थ्यासाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेल्या असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बापाच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात, काळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत. किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर, सर्व किती मस्त असेल.

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, मकर, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते. घरातील लाहलागी, मोठी अगदी उत्साहाने तैयारी लागतात. या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची, कैलाश पर्वत, गढ कि आणखी वेगळं काही, हे चर्चा खूप मजेशीर असते. कोणी म्हणत पूर्ण मकर घरी बनवू, कोणी म्हणत बाजारातून विकत आणू. हि हुज्जत हि खूप छान असते.

READ  संत गाडगे महाराज

गणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर, अंगण साफ करायला घेतात, घरातील सगळे अगदी उत्साहात यात भाग घेतात. कितीही परब तैयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते. मकर बनवणे, पताका चिकटवणे, दिवे, पणत्या, समई शोधून स्वच्छ करून ठेवणे, या सर्व धावपळीत हि खूप मजा येते.

नातेवाईक सुट्ट्या काढून घरी येतात, आपले चुलत, मावस, आत्ते भाऊ भहिनी येतात. लहानगी तर कल्ला करतात. मोठयांच्या गप्पा-टप्पा, छोट्यांच्या खोड्या आणि खेळांनी घर, आंगण अगदी प्रसन्न होऊन जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे लवकर उठतात, फटाफट स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.आई,आजी प्रास, नैवद्य आणि मोदकांच्या तैयारी साठी लागतात. बाबा आणि आम्ही सारी लहानगी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातो. नाचत-वाजवत आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येतो. अंगणात आल्यावर आई पूजा करते, आरती ओलावते आणि मग गणेश भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ होतात. थोड्या वेळाने आरती होते, ढोलकी, टाळ, टाळ्यांच्या आवाजाने घर दूम- दूमून जाते. मोदकांचा नैवद्य दाखवला जातो, आरती फिरवली जाते, प्रसाद वाटलं जातो. त्या डोपारी सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.

कोणाच्या घरी गणेश भगवान दिढ दिवस तर कोणाकडे ५,७, किंवा १० दिवस वास करतात. गणपती बाप्पांसोबत त्यांच्या मातोश्री, गौरी सुद्धा येतात. घरातील स्त्रिया खूप भक्ती भावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात.

बघता बघता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस उजाडतो. सर्वानांच माहीत असते कि हा दिवस येणार तरीही मन उदास होते. विसर्जनाच्या दिवशी, किंवा अनंत चतुर्दशीच्या च्या दिवशी गणपती बापाचे नाचत गात विसर्जन केले जाते.

गणेशोत्सव माझा आवडता सण आहे कारण या सणात सर्व घराचे, समाजाचे सदस्य एकत्र येतात. आपले वाद-विवाद, रुसवे-फुगवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. विविध धर्माचे लोक सुद्धा धार्मिक सीमा पार करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आपण आज पाहू शकतो. भारतात नाना प्रकारचे धर्म,जाती आणि वाद आहेत. देशाच्या उन्नतीसाठी हे सगळे एकत्र आणि आनंदात राहणे खूप गरजेचे आहे. गणेशोत्सव सण माझा आवडता सण आहे कारण हा सण घरच्यांना, समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.

READ  मुख्याध्यापकास पत्र

सूचना: आजकाल गणपती सणामध्ये खूप भानगडी सुद्धा होतात, राजकारणी लोक याचा आपल्या राजकारणासाठी करतात. इको फ्रेंडली गणपती, या सणामध्ये होणारे प्रदूषण, राजकारण, सार्वजनिक मंडळांची अरेरावी असे विवाद, समस्यासुद्धा आहेत, आणि त्या खऱ्या सुद्धा आहेत. पण या निबंध किंवा भाषांनामध्ये आम्ही या सणाच्या सकारात्मक गोष्टींवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.

%d bloggers like this: